अमेरिकन पर्यटकांना तालिबानचे अनोखे आमंत्रण; बंदुकांसह सुंदर दृश्ये दाखवत बनवली खास रिल, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल : अफगाणीस्तानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खास अमेरिकेन लोकांसाठी बनवण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषांगाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तालिबानने एक प्रमोशनल व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये तालिबानच्या लोकांनी अमेरिकन लोकांना पर्यटनासाठी अफगाणिस्तानमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे.
या व्हिडिओमध्ये काही अफगाण लोकांनी बंदुंका घेऊन व्हिडिओ बनवला आहे. लोकांनी शस्त्रे घेऊन अफगाणिस्तानमदील सुंदर ठिकाणांचे दृश्य दाखवले आहे. तसेच अमेरिकन लोकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी यावे असा संदेश यामध्ये देण्यात आला आहे. परंतु अद्याप हा व्हिडिओ तालिबानने बनवला आहे का नाही याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
२०२१ मध्ये तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आले. तेव्हापासून दहशतवादी गट देशात पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये लोक अफगाणी आणि तालिबान कपडे परिधान केलेले दिसत आहे. तसेच यामध्ये एकाला अमेरिकन व्यक्ती म्हणून दाखवण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिमध्ये तीन मुखवटा घातलेले लोक ओलिसींच्या मागे उभे राहिले आहेत. ओलिसांच्या तोंडवरील कापड हटवण्यापू्र्वी हे लोक अमेरिकेला एक संदेश असे म्हणतात. त्यानंतर एका व्यक्तीचा मुखवटा काढला जातो आणि अफगाणिस्तानात आपले स्वागत आहे म्हणतो. त्यानंतर व्हिडिओमध्ये अनेक सुंदर दृश्ये दाखवण्यात आली आहेत. बंदुक, शस्त्रे घेऊन या व्हिडिओ बनवणाऱ्यांनी सुंदर दृश्यांचे चित्र दाखवले आहे. तसेच आमच्या मातृभूमीला तुमच्यापासून आम्ही मुक्त केले आहे, आता तुमचे आमच्या देशात पर्यटक म्हणून स्वागत आहे, असे या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले आहे.
The Taliban has released a tourism appeal video aimed at attracting American visitors
Their message to Americans:
“Now that we’ve liberated our homeland from you, you’re welcome to come back as tourists or guests”Would you go? #Afganistan pic.twitter.com/iLRYXFAJjn
— Nabila Jamal (@nabilajamal_) July 9, 2025
अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून युद्ध सुरु होते. यामुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. यामुळे अफगाणिस्तानला आर्थिक संकटाचा सामान करावा लागत होता. २०२१ मध्ये अमेरिका अफगाणिस्तानमधून परतले आणि तालिबान सरकार सत्तेत आले. तेव्हापासून देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी तालिबान सरकार प्रयत्न करत आहे. परंतु अजूनही तालिबानमध्ये परिस्थितीत सुधारलेली नाही. शिवाय तालिबानला दहशतवादी राजवट म्हणूनही ओळखले जाते.