वाघाच्या तोंडात हाथ घालून तरुण करत होता स्टंटबाजी तितक्यात वाघाने केलं असं...आयुष्यभराची घडली अद्दल, Video Viral
प्राण्यांशी मैत्री आणि शत्रुत्व या दोन्हींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. पण जेव्हा जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राण्यांसोबत स्टंट करण्याचा विचार येतो तेव्हा अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण सर्कसचा वाघही कधीही आपले खरे रंग दाखवू शकतो. वाघ हा सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आहे. त्याला जंगलाचा राजा मानले जाते. अशात या राजाशी कधीही मस्ती करू नये नाहीतर ही मस्ती कधी कुस्करीत बदलेल हे समजणारही नाही. अशाच एका मस्तीची कुस्करी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करू पाहतात. जीवघेणी स्टंटबाजी आणि विचित्र गोष्टी करून लोक आपल्या व्हायरल करू पाहतात मात्र त्यांचा हा प्रयत्न सफल होतोच असे नाही. बऱ्याचदा लोक करायला काही एक जातात आणि घडत भलतच. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण साखळदंडात बांधलेल्या वाघाच्या तोंडात हात घालताना दिसून येत आहे. यावेळी तरुणाने आपला हाथ वाघाच्या जबड्यात टाकल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा – आपली क्षणिक चूक तरुणाला पडली महागात! हातात फुटला ज्वलंत फटाका अन् Viral Video पाहून लोकांना बसला शॉक
मात्र नंतर जेव्हा तो आपला हाथ त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वाघ मात्र त्याला असे करू देत नाही आणि त्याचा हाथ वाघाच्या जबड्यात अडकून राहतो. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माहितीनुसार, हा व्हिडिओ एका पाकिस्तानी इन्फ्लुएनसर आहे. तो आपल्या अकाउंटवर नेहमीच वाघासोबतचे असे बरेच व्हिडिओज शेअर करत असतो. व्हिडिओत दिसणारा वाघ हा त्याचा पाळीव प्राणी आहे.
हेदेखील वाचा – जीवनात एक तरी असा मित्र हवा! चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच मित्राने केलं असं… मृत्यूचा थरार अन् Video Viral
हा व्हायरल व्हीडीओ @nouman.hassan1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मोठ्या दातांचा वाघ’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे त्वचेला सहजपणे पंक्चर करू शकते किंवा तुमच्या खांद्यावरून तुमचा हात फाडून टाकू शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, जरा काळजीपूर्वक” तर तिसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचाऱ्या वाघाला चार दातांपेक्षा अधिक दात नाहीत.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.