जेव्हापासून इंटरनेट आणि सोशल मीडिया आपल्या आयुष्यात आले आहे, तेव्हापासून आपल्याला दररोज काहीतरी मनोरंजक पाहायला मिळत आहे. विशेषत: सणासुदीचा हंगाम सुरू असेल तर अशा रिल्स दिसतात ज्यांच्याशी लोक लगेच जोडले जातात. सोशल मीडियावर या रिल्स दररोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लोक या रिल्सची फार मजा घेतात. सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळत असतात. हे व्हिडिओ कधी लोकांना हसवतात कधी भावुक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात.
सध्या दिवाळीचा काळ सुरु होता. त्यानिमित्त दिवाळी सेलिब्रेशन आणि फटाक्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यात काही असे व्हिडिओ देखील होते ज्यात आपल्याला फटाक्यांचा नीट वापर न केल्याने झालेले अपघात दिसून आले. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरुणाला आपली एक लहान चूक फार महागात पडल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्याच्या हातात एक भलामोठा ज्वलंत फटाका फुटतो. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
हेदेखील वाचा – जीवनात एक तरी असा मित्र हवा! चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच मित्राने केलं असं… मृत्यूचा थरार अन् Video Viral
दिवाळीच्या दिवशी घरात रोषणाई करण्याबरोबरच लोक फटाकेही फोडतात. काही लोकांना ते इतके आवडते की ते त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे देखील विसरतात. असाच विश्वासघात एका मुलासोबतही झाला. तो फटाके फोडत होता पण पुढे जे घडले ते कोणालाही हसायला पुरेसे आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुले दिवाळीत फटाके फोडताना दिसत आहेत. एका मुलाच्या हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात स्काई शॉट फटाका आहे. यावेळी रस्त्यावर पडलेला फटाका तो स्वत:पासून दूर करत असताना त्याच्या हातातील अगरबत्ती त्याच्या दुसऱ्या हातातील फटाक्याला आग लावते. मुलगा हे बघतही नाही, इतक्यात त्याच्या हातात हा फटाका जोरात फुटतो. तो मुलगा कोणत्या अवस्थेत असेल याची कल्पना व्हिडिओ पाहूनच येऊ शकते.
हेदेखील वाचा – श्रद्धा की अंधश्रद्धा! AC’च्या पाण्याला चरणामृत समजून पिऊ लागली लोक, सत्य उघड होताच… पाहा Viral Video
हा व्हायरल व्हिडिओ @venky_vr__12 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मोये मोये’ असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 350 मिलियन लोकांनी पाहिला आहे, तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याचा हात ठीक आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच बोलतात स्वतःवर लक्ष द्या, दुसऱ्यांवर नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.