मैत्री हे एकमेव असं नातं आहे, जे आपण स्वतःहून बनवतो. आई-वडील, भाऊ-बहीण ही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात मात्र मैत्रीचे नाते मात्र आपण स्वतः बनवतो. असे म्हणतात, आयुष्यात एक तरी आपल्या हक्काचा मित्र असावा जो आपल्या सुख-दुःखात आपल्या सोबत राहील. मात्र असे मित्र मिळायला फार नशीब लागत. मैत्रीचे एक उत्तम उदाहरण सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून आले आहे. यात एक तरुण चक्क मरता मरता वाचल्याचे दिसून आले. जसे यमराजाच्या हातून सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले तसे यात तरुणाच्या मित्राने त्याचे प्राण जाता जाता वाचवल्याचे दिसून येत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘
काय आहे व्हिडिओत?
तर या व्हायरल व्हिडिओमध्ये, चालू रस्त्यावर दोन मित्र रस्त्याच्या कडेने पायी चालताना दिसत आहेत. यावेळी अचानक त्यांच्या बाजूने जाणारा ट्रक उलटा होतो आणि थेट तरुणांच्या दिशेने उलटा होऊ लागतो. हे सर्व दृश्य अंगावर शहरे आणणारे आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता या तरुणाचा जीव जाणार असे वाटू लागते मात्र तितक्यात बाजूला उभा असलेला त्याचा व्यक्ती प्रसंगावधान दाखवतो आणि जोरात आपल्याकडे त्याला ओढतो. ज्यामुळे त्याचे तरुणाचा जीव जाता जाता राहतो आणि अगदी त्या उलट्या ट्रकच्या बाजूला येऊन हा तरुण पडतो आणि थोड्याश्या फरकाने त्याचा जीव वाचतो.
हेदेखील वाचा – श्रद्धा की अंधश्रद्धा! AC’च्या पाण्याला चरणामृत समजून पिऊ लागली लोक, सत्य उघड होताच… पाहा Viral Video
आपल्या मित्राचे प्राण वाचवणाऱ्या या तरुणाचे आता सोशल मीडियावर फार कौतुक केले जात आहे. त्यांने हिम्मत केली नसतो तर आज त्याच्या मित्र मृत्यूच्या दारी निश्चितच पोहचला असता. मात्र सुदैवाने असे काही घडले नाही आणि तरुणाचा जीव बचावला. ही घटना कुठली आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही पण आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तरुणांच्या मृत्यूचा हा थरार पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.
हेदेखील वाचा – मुक्त आकाशाखाली महिला घेत होती गाढ झोपेची मजा तितक्यात मागून आला साप अन्… धक्कादायक Video Viral
मृत्यूच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ @_aj_ay_011 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘जिवलग मित्र, देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 4 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दादा सलाम तुमच्या प्रसंगावधानाला… अशावेळी खरंतर माणसाला काय करावं समजत नाही… कदाचित घाई गडबड मध्ये आपण समोरच्या व्यक्तीचा हात सोडून देखील पळू शकतो परंतु तुम्ही जे प्रसंगावधान राखले ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरच खुप मनाला लागला हा व्हिडिओ..मरणाच्या दारातुन पण परत आणलं रे मित्रा तु” .
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.