पांचट Jokes : बॉयफ्रेंड – तुम्ही मुली लव्ह मॅरेज का करता…? उत्तर ऐकाल तर हास्याला बळी पडाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नात आणखीन फुलतं जेव्हा यात हास्याचं संभाषण रंगतं. प्रियकर प्रेयसीचे हे खट्याळ आणि मजेदार विनोद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील. वेळ काढा आणि वाचा जरूर.
मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला तिच्या आईला भेटायला घेऊन गेली… दुसऱ्या दिवशी…
गर्लफ्रेंड – माझ्या आईला तू खूप आवडलास .
बॉयफ्रेंड – चल वेडी… काहीही झालं तरी, मी लग्न तर तुझ्याशीच करणार, आईला सांग की मला विसरून जा…
बॉयफ्रेंड – वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग, सांग तुला माझ्याकडून काय भेटवस्तू हवी आहे?
गर्लफ्रेंड – फक्त तुझा एटीएम नंबर आणि पासवर्ड सांग, तेवढे बस झालं बाकी मला काय नको… !
गर्लफ्रेंड : जेव्हा तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस?
बॉयफ्रेंड : मी तुझी आवडती चॉकलेट खातो…
आणि जेव्हा तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस…
गर्लफ्रेंड : मीही गुटखा खातेमुलगा- तुम्ही मुली प्रेमविवाह का करता..?
बॉयफ्रेंड – तुम्ही मुली लव्ह मॅरेज का करता?
गर्लफ्रेंड – अज्ञात व्यक्ती मिळण्यापेक्षा ओळखीचा बावळट भेटलेला चांगला! तुम्ही मुलं प्रेमविवाह का करता..?
बॉयफ्रेंड – अॅनाकोंडा मिळण्यापेक्षा आधीच पाळलेला साप मिळालेला बरा..!
गर्लफ्रेंड – प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन
बॉयफ्रेंड – पण का?
गर्लफ्रेंड – बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन…
गर्लफ्रेंड म्हणाली भांडणामुळे प्रेम वाढतं
मग काय बॉयफ्रेंडनेही गर्लफ्रेंडच्या एक कानाखाली लगावली आणि तिथून पळतच सुटला…!
बऱ्याच दिवसांनी शायर बॉयफ्रेंडला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण आली
आठवणीत त्याने शायरी बनवली आणि म्हणाला…
तुझे ते मंद हसणे
तुझे ते मंद लाजणे
तुझे ते मंदआवाजात बोलणे
तुझे ते मंद चालणे
जरा मंदच होती ती…
गर्लफ्रेंड – माझा फोन माझ्या आईकडे आहे.
बॉयफ्रेंड – जर तू पकडली गेलीस तर?
गर्लफ्रेंड – मी तुझा नंबर ‘बॅटरी लो आहे’ म्हणून सेव्ह केला आहे.
जेव्हा जेव्हा मला तुझा फोन येतो तेव्हा माझी आई म्हणते की फोन चार्ज कर, बॅटरी लो होत आहे.
बॉयफ्रेंड अजूनही बेशुद्ध…
गर्लफ्रेंड – हॅलो बेबी… मला तुझी आठवण येत आहे
बॉयफ्रेंड – माझा पगार अजून झाक नाही बेबी
गर्लफ्रेंड – ठीक आहे, चल बाबा आले आहेत… बाय!
Web Title: Panchat jokes boyfriend asks girlfriend why do you girls do love marriages read this funny jokes in marathi and laugh louder