Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेमाचाच वर्षाव होत नाही तर यात वादावादी, खट्याळ विनोद यांचाही जरा मजेदार तडका असतो. व्यस्त जीवनातून वेळ काढा आणि हसायला अजिबात विसरू नका.
सकाळी सकाळी पत्नीला खुश करण्यासाठी पतीने दुधाचे टोप काढले आणि
गॅसवर हा टोप उकळायला ठेवून दिला, १० मिनिटे झाले तरी दूध काही उकळेना
शेवटी त्याला कळलं की ते दूध नसून इडलीचं पीठ आहे
बायको – काल आलेला भिकारी खूप वाईट होता..
नवरा – का.. काय झालं..?
बायको – काल मी त्याला जेवण दिलं आणि आज त्याने मला एक पुस्तक दिलं आहे..
नवरा – कोणतं पुस्तक..?
बायको – “स्वयंपाक करायला शिका”
नवरा – मॅचचं चॅनल ऑन कर!
बायको – मी नाही लावणार, काय करणार तुम्ही
नवरा – मी बघून घेईल
बायको: काय बघणार?
नवरा – तू बघणार तो चॅनेल…
नवरा (फोनवर बायकोला) – तू खूप गोड आहेस…!
बायको – थँक यू…!
नवरा – तू अगदी राजकुमारीसारखी दिसतेस…!
बायको – थँक यू सो मच… आणि सांगा तुम्ही काय करत आहात
नवरा – अरे काय नाय, रिकामाच होतो तर विचार केला जरा विनोद करावा…
नवरा त्याच्या रागावलेल्या बायकोला रोज फोन करतो..
सासू फोन उचलून म्हणते – मी तुला किती वेळा सांगितले की, ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग तू मला रोज का फोन करतोस?
नवरा – ऐकायला छान वाटतं म्हणून…
पत्नी – मी हरवली तर तू काय करशील?
पती – मी वर्तमानपत्रात जाहिरात देईन…
पत्नी – तुम्ही किती चांगले आहात, काय लिहाल त्यात
पती – ही ज्याला सापडेल त्याची…
नवरा (बायकोला) – मला थोडं पाणी दे…
बायको – तुला तहान लागली आहे का?
नवरा (रागाने) – नाही नाही, मला चेक करायचं आहे की माझा घसा लिक तर होत नाहीये…
संध्याकाळी नवरा खूप दुःखी होऊन घरी परतला
बायको – अहो काय झालं?
नवरा – आज आमच्या ऑफिसची इमारत कोसळली आणि सर्व लोक मेले…!
बायको – मग तुम्ही कसे वाचलात…?
नवरा – मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो…!
बायको – बरं, देवाचे आभार…!
थोड्याच वेळात टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या की सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे…!
बायको रागावली – मला माहित नाही की तुम्ही सिगारेट ओढण्याच्या या सवयीपासून कधी मुक्त होणार आहात…?
नवरा – मी तुला या महिन्यात आणखी पैसे देणार नाही
बायको – मला फक्त ५०० रुपये उधार द्या
मी तुमचा पगार झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे परत करेन…
नवरा – माझ्या छातीत खूप दुखत आहे, लवकर ऍम्ब्युलन्स बोलवं
बायको – हो, मी फोन करते. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा
पती – राहू दे, मला आता थोडं बरं वाटतंय…
बायको – तुमच्या शर्टवर तर एकही केस सापडला नाही
पती – मग काय,
बायको – मी विचारते कोण आहे ती टकली…
Web Title: Panchat jokes wife had a doubt about her husband said there is no hair in your shirt read funny husband wife jokes which will makes you laugh