पांचट Jokes : मुलगा बाबांना विचारतो; बाबा पुरुष म्हणजे नक्की कोण ओ… ? उत्तर वाचाल हसू आवरणं कठीण होऊन बसेल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! मुलाचे तुचकट प्रश्न वडिलांना हैराण करतात पण शेवटी मुलगा जे उत्तर देतो ते ऐकून वडील कोमात जायचेच बाकी राहतात. रोजच्या जीवनातून वेळ काढून वडील-मुलाचे हे भन्नाट विनोद एकदा वाचाच!
वडील – बेटा, मला तुझा मोबाईल १ मिनिटासाठी दे..
मुलगा – बाबा, १ मिनिट मला फोन ON करू दे
व्हिडिओ डिलीट कर… फोटो डिलीट कर… कॉल डिलीट कर… मेसेज डिलीट कर… हे बघा बाबा, ON झाला!
बाबा – अरे नाही नाही, मला फक्त किती वाजले ते सांग…
वडील – रूममध्ये इतका धूर का आहे?
पप्पू – पप्पा मी ते डासांसाठी पेटवले आहे
पप्पा – पण वास तर सिगारेटसारखा येतोय
पप्पू – हो, तो मर्टिन संपला होता तर मला वाटलं की सिगारेट जाळून बघावं, ते पण जीव घेण्यासाठी फेमस आहे ना…
मुलगा – बाबा, तुम्ही दारू नका पीत जाऊ…
वडील – मला पिऊ दे बेटा, वर कायच घेऊन जायचं आहे?
मुलगा – जर तुम्ही असेच पित राहिलात तर मागे तरी काय सोडून जाणार?
मुलगा – पप्पा मी लग्न करणार नाही, मला सगळ्या बायकांची भीती वाटते
वडील – बेटा लग्न कर, लग्नानंतर तुला फक्त एकाच बाईची भीती वाटायला लागेल, बाकी सगळ्याच चांगल्या वाटू लागतील…
वडील – तू का दुःखी आहेस बेटा?
मुलगा – मी तुम्हाला नाही सांगू शकत…
वडील – मला तुझा मित्र समज आणि मला सांग
आता मी तुला काय सांगू मित्रा.. तुझी वहिनी आयफोन मागत आहे…
मग काय दणादण चापटांचा मारा…
अचानक मुलाने विचारले – बाबा, पुरूष कोण असतो?
वडील – बेटा, संपूर्ण घरावर राज्य करणाऱ्या व्यक्तीला पुरूष म्हणतात
मुलगा – बरं बाबा, मग मीही मोठा झाल्यावर मम्मीसारखा पुरूष होईन…
वडील – तू नापास कसा झालास?
मुलगा – काय करू बाबा, परीक्षेत सगळे उलटे सुलटे प्रश्न आले होते, जे मी केले नाही
वडील – मग तू काय लिहिलंस?
मुलगा – मी काय घाबरतोय का, मी पण सर्व उलटी सुलटी उत्तरं लिहून आलो…
वडील – जर तू पुन्हा परीक्षेत नापास झालास तर मला बाबा म्हणू नकोस…
निकालानंतर..
वडील – तुझा निकाल काय लागला?
मुलगा – डोकं नको खाऊस मदनलाल, तू वडील होण्याचा अधिकार गमावला आहेस…
Web Title: Panchat jokes the son asks his father who is a man answer will makes you laugh read father son marathi jokes