पांचट Jokes : गोलमटोल बटाट्याला स्लिम ट्रिम भेंडीने केलं रिजेक्ट, शेवटी बटाट्याने असा बदला घेतला की…वाचूनच हसू फुटेल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! बटाट्याचं प्रपोजल भेंडीने क्षणातच केलं रिजेक्ट, मग बटाट्याने काय केलं ते एकदा वाचा जरूर. कामाच्या व्यापातून वेळ काढत भाज्यांचे हे मिश्किल विनोद एकदा वाचा जरूर...
एकदा एका बटाट्याने भेंडीला हाक मारली आणि म्हटले – आय लव्ह यू..!
भेंडीला खूप राग आला, तिने बटाट्याला खूप फटकारले..!!
ती म्हणाली – तू खूप जाड आणि स्वस्त आहेस आणि मी इतकी सडपातळ आणि सेक्सी..!!
बटाट्याचे मन अगदी तुटले..! तेव्हापासून, बटाट्याने इतक्या भाज्या पटवल्या की तुम्ही स्वतः पाहू शकता..!
बटाटा – कोबी
बटाटा – वांगी
बटाटा – मिरची
बटाटा – पालक
बटाटा – वाटाणे
बटाटा – हरभरा
बटाटा – मेथी
…..आणि…..
भेंडी त्या दिवसापासून आजपर्यंत एकटी आहे…!
कोबी आणि कांद्याची घनिष्ठ मैत्री
टोमॅटो कोबीला म्हणतो – तुला खाल्ल्यानंतर तोंडाला वास का येतो
कोबी टोमॅटोला म्हणते – मी आंघोळ करत नाही करत ना म्हणून?
टोमॅटो – तू आंघोळ का करत नाही?
कोबी – मी आंघोळ कशी करू? कपडे काढेपर्यंतच संध्याकाळ होऊन जाते…
वांगी – मी लोकांना फारच आवडते!
बटाटा – हो पण मी लोकांच्या सगळ्या भावनांमध्ये असतो – समोशातही, भाजीमध्येही आणि अगदी चिप्समध्येही!
कांदा विचारतो -“का रडतोयस रे?
टोमॅटो – काल मी सूपात पडलो… लोकांनी मला उकळून टाकलं!
कांदा – अरे मग मी बरा, मला तर पाहताच लोकांच्या डोळ्यात पाणी येत…
पालक गाजरला म्हणते – तुला कसं माहिती की गाजर डोळ्यांसाठी फायद्याचा आहे
गाजर उत्तर देत म्हणतो – तू कधी सश्याला चष्मा घालून पाहिलं आहेस का?
भाजीवाला खुप वेळ झाला भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते, भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या.
नवरा – आज भाजी नीट शिजली नाहीये…!
बायको – निमूटपणे खावा… या भाजीला फेसबुकवर ६०० लोकांनी लाईक केली आहे आणि ५०० लोकांनी कमेंटमध्ये ‘स्वादिष्ट’ असेही लिहिले आहे…
आणि तुमची नाटकं बघा…
नवरा बेशुद्ध पडतो…!
बायको – अहो… भाजी कशी झाली आहे?
नवरा – खूप छान झाली आहे…
बायको – पण आपला सोन्या म्हणाला… चांगली नाही झाली!
नवरा – लग्न झाल्यानंतर कळेल सोन्याला…कुठे काय बोलायचं ते!