
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी केली मारहाण! सरपंच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नीने भररस्त्यात घातला राडा, Video Viral
सध्याच्या युगात खरं प्रेम फार कमी पाहायला मिळत. अनेकदा आपण विवाहित असूनही लोक बाहेर अफेर्स करू पाहतात. मात्र तुम्ही ती गोष्ट तर ऐकलीच असेल की, चूक कधीही लपून राहत नाही. आपण कितीही डोळे झाकून गोष्टी करू पाहिल्या तरी सत्य हे कधी ना कधी समोर येतेच. आता तुम्हीच विचार करा एका पत्नीने आपल्या नवऱ्याला परस्त्रीसोबत फिरताना बघितले तर ती काय करेल? सुचत नसेल तर आजचा हा व्हायरल व्हिडिओ पहा. आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना पाहून पत्नीने अक्षरशः भररस्त्यात राडा घातला आणि पतीच्या गर्लफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही संपूर्ण घटना मध्य प्रदेशमधील इंदूर या ठिकाणी घडली आहे. संतापलेल्या पत्नीने त्या महिलेला केसांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे यात नवऱ्याने कोणत्याही हस्तक्षेप केला नाही आणि लाजिरवाण्या नरजेने तो हा सर्व प्रकार बघत राहिला. उषा आर्य अशी ओळख असलेल्या महिलेने काही दिवसांपूर्वी तिचा सरपंच पती जितेंद्र माळी याचे त्याच्या गर्लफ्रेंड पूजासोबतचे रोमँटिक चॅट्स पाहिले. त्यानंतर तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. ही घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सरपंच जितेंद्र माळी आणि त्याची कथित प्रेयसी एका कारमध्ये बसले आहेत. याच दरम्यान सरपंचाची पत्नी तिथे येते आणि भयंकर संतापलेल्या अवस्थेत ती त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करते. ती सरपंचाच्या गर्लफ्रेंडला बुक्क्यांनी मारहाण देखील करते. यानंतर ती त्यांना कारमधून बाहेर निघण्याची धमकी देते. या सगळ्या घटनेदरम्यान प्रेयसी सरपंचाच्या पत्नीला विचारते की, “तू कोण आहेस? मी तुला ओळखतही नाही.” यावर पत्नीसोबत आलेला एक पुरुष म्हणतो, “ठाणे में बताएंगे हम कौन है.
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @indorehighlights नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आलिया आहे. FPJच्या वृत्तानसार , नीमचमधील सावन गावचे सरपंच जितेंद्र माळी (45) यांची दुसरी पत्नी उषा आर्य यांनी बुधवारी पतीला प्रेयसीसह कारमध्ये बसले असताना रंगे हाथ पकडले. विशेष म्हणजे तो इंदूर रोडवरील लाल गेटजवळील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसह राहत होता असे सांगण्यात येत आहे. आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच उषा गर्लफ्रेंडच्या अंगावर धावून गेल्या. गोंधळ झाल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांनाही नानाखेडा पोलिस ठाण्यात नेले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उषाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी पूजा आणि तिच्या पतीमधील चॅट पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या नात्याबद्दल कळले, त्यानंतर त्यांचे फोटो मिळाल्यानंतर तिने पतीला समजावून सांगितले. तिने मुलांसाठी आरडाओरडा केला आणि त्यांचे पाय धरून माफी मागितली, परंतु त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झाला नाही, त्यानंतर तिला समजले की ते दोघेही उज्जैनला गेले आहेत, म्हणून तिने त्यांचा पाठलाग करून दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी महिलेने सांगितले की, चॅट पकडल्यानंतर मी माझ्या पतीच्या मैत्रिणीला खूप समजावले, पण ती मान्य झाली नाही, त्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.