मुंबई : नुकत्याच हाती आलेल्या मोठ्या वृत्तानुसार, आता उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray Camp) शिवसेनेच्या (Shivsena) ट्विटर अकाउंटवरून (Twitter A/C) ब्लू टिक (Blue Tick) हटवण्यात आली आहे. आता हे खाते ‘व्हेरिफाइड’च्या श्रेणीत नसल्याचे स्पष्टपणे समजते. आता असे का घडले याबाबत पक्ष किंवा ट्विटरकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
लक्षात ठेवा, Twitter च्या नियमांनुसार, जर एखाद्या व्हेरिफाइड युजरने त्याचा/तिचा प्रोफाईल फोटो, डिस्प्ले नाव किंवा युजरनेम (@हँडल) बदलला तर, त्या खात्याची ब्लूटिक आपोआप काढून टाकली जाईल आणि खाते पुन्हा व्हेरिफाइड होईपर्यंत कोणतीही ब्लूटिक दिसणार नाही.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने यापूर्वी आपला प्रोफाइल फोटो आणि नाव बदलले होते, त्यामुळे आता ब्लूटिक जाण्याचे हे प्रमुख कारण असू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.
[read_also content=”धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाने केला क्रौर्याचा कळस, कट्टा दाखवून दमदाटी, दलिताच्या लग्नात धमकावलं, मारहाणही केली; पाहा VIDEO https://www.navarashtra.com/crime/mp-crime-news-dhirendra-shastri-bageshwar-dham-sarkar-brother-crashes-wedding-with-pistol-and-abusive-language-viral-video-social-media-nrvb-370718/”]
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ वापरण्याची परवानगी दिली. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय ‘लोकशाहीसाठी धोकादायक’ असल्याचे म्हटले होते. यासोबतच याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही उद्धव यांनी म्हटलं होतं.