अतिशहाणपणा नडला! फणा काढत मुंगुसासमोर डिंग्या मारत होता नाग, तितक्यात बदलला खेळ; जीवघेण्या लढतीचा Video Viral
सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी थरारक स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी जीवघेण्या अपघातांचे व्हिडिओ, बऱ्याचदा इथे काही मजेदार हास्यास्पद व्हिडिओ देखील शेअर होत असतात. याचबरोबर सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित काही व्हिडिओही शेअर होतात आणि ते व्हायरल देखील होतात. लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडते. नुकताच सोशल मीडियावर नाग आणि मुंगुसाच्या लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओचा शेवट तुम्हाला थक्क करेल.
साप हा एक सर्वात धोकादायक आणि जीवघेण्या प्राण्यांपैकी एक आहे. तो आपल्या विषारी गुणधर्मासाठी ओळखला जातो. सापाचा एक दंश कुणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. अशात कुणीही त्याच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नाही. सापाला फक्त प्राणीच काय तर माणसंही फार घाबरतात. यामुळेच तो गर्वाने सर्वत्र वावरत असतो मात्र सध्याच्या व्हायरल व्हिडिओत काहीतरी भलतेच घडल्याचे दिसून येत आहे. आपल्या ताकदीवर अतिविश्वास ठेवणारा साप जेव्हा मुंगुसावर आपला फणा काढतो तेव्हा मुंगूस त्याची हवा टाइट करू सोडतो. चला व्हिडिओत नाक्की काय घडते ते जाणून घेऊयात.
Viral Video: बाळाला दूध आणायला गेली पण तितक्यात सुरु झाली ट्रेन, डोळ्यातील आक्रोश अन् पुढे काय झालं?
काय आहे व्हिडिओत?
साप आणि मुंगूस यांचे वैर फार जुने आहे. उघड्या डोळ्यांनाही हे दोघे एकमेकांना आवडत नाहीत. अशा स्थितीत जिथे जिथे ते आमने-सामने येतात तिथे ते सूड घेण्याचा प्रयत्न करतात. साप आणि मुंगूस यांचा एकमेकांबद्दलचा हा वैर पाहणाऱ्यांसाठी मात्र मजेचा विषय बनला. साप आणि मुंगूस यांच्यातील लढतीचा असाच एक व्हिडिओ एका IFS अधिकाऱ्याने इंटरनेटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये साप आपला फणा काढत मुंगुसावर हल्ला करताना दिसून आला. पण मुंगूस कसा तरी त्याच्या पहिल्या हल्ल्यातून वाचतो. मग साप फणा पसरवताच वेगाने दुसऱ्यांदा हल्ला करतो. त्यामुळे मुंगूस लगेचच त्याला पकडतो आणि तोंडाने त्याचा फणा दाबतो. यानंतर आपण मुंगूसाच्या तावडीत अडकलेला सापाचा जीव तडफडताना पाहू शकतो. या शेवटासहच मुंगूस सापावर विजय मिळवतो आणि सापाला आपली हार पत्करावी लागते.
That was really swift.
The instinct of mongoose are really lightning😌 pic.twitter.com/EG8z6Z44Mo— Susanta Nanda (@susantananda3) January 7, 2025
मुंगूस-सापाच्या या लढतीचा व्हिडिओ @susantananda3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ते खरोखरच वेगवान होते. मुंगूसची प्रवृत्ती खरोखरच तेजस्वी आहे’ असे लिहिले आहे. व्हिडिओला 44 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी, भारतीय कोब्रा – ग्रहावरील सर्वात वेगवान आणि आक्रमक सापांपैकी एक. पण मुंगूस त्याच्यापेक्षा वेगवान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मस्त, ते खरोखरच फार वेगवान होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.