(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. यात कधी स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होत असतात तर कधी हास्यस्पद तर कधी अपघातांचेही व्हिडिओ इथे शेअर केले जातात. अपघातांच्या व्हिडिओतील थरार दृश्ये नेहमीच लोकांना आश्चर्यचकित आणि थक्क करत असतात. त्यातच आता सोशल मीडियावर अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे, यातील दृश्ये तुमच्या पायाखालची कमी हादरवेल.
अनेकदा लोक घाईगडबडीत आपल्या जीवाची पर्वा न करत असे काही करू पाहता ज्याचा पुढे जाऊन त्यांना पश्चाताप होईल. घाईगडबडीचा या निर्णयांमुळे दररोज अनेकजण आपले प्राण गमावतात. पण आपल्यावर जर आपले नशीब मेहरबान असेल तर कठीणातल्या कठीण प्रसंगातूनही तुम्ही सहज बाहेर पडू शकता. सध्या याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. यात एक व्यक्ती आपल्या चुकीमुळे अक्षरशः दोन चालू बसच्या मधोमध येऊन चिरडतो. यानंतर त्याचा जीव जातोय की काय असेच सर्वांना वाटू लागते मात्र याचा शेवट पाहून सर्वच आवाक् होऊन जातात.
काय आहे व्हिडिओत?
तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यात एक माणूस चालू बस पकडण्यासाठी रस्त्याच्या दिशेने पळत असतो. रस्त्यावर पोहोचताच भरवेगात अजून एक बस या बसच्या बाजूने येते आणि त्या दोन बसच्या मध्येच हा माणूस चिरडला जातो. यांनतर बस पुढे जाऊन थांबते आणि तो माणूस रस्त्यावर खाली पडतो. यानंतर अनेकांना वाटले असेल की व्यक्तीचा जीव गेला असेल मात्र असे काहीच होत नाही पुढच्याच क्षणी तो उभा राहून जणू काही घडलेच नाही असे दर्शवत तिथून निघून जातो. दरम्यान हा व्हिडिओ आता अनेकांना थक्क करण्याचे काम करत आहे.
बापरे! चिमुकल्याला उचलले अन् धाडकन जमिनीवर आपटले, पाहूनच अंगावर काटा येईल, Video Viral
अपघताचा हा मजेदार व्हिडिओ @chalapathichangala नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याचे लायसन्स रद्द करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जे काही घडणार आहे ते भगवंताने ठरवल्याप्रमाणेच होईल”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मृत्यूला मिठी मारत तो आरामात पुन्हा परतला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.