Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात श्वानांची दहशत! चिमुकलीवर चढवला हल्ला, हाता-पायांना चावले अन् शेवटी फरफटत घेऊन गेले; भयावह Video Viral

Dog Attack Video: हैदराबादमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीवर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ते इतक्या क्रूरतेने तिला फरफटत घेऊन जातात की पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. घटनेतील दृश्ये आता लोकांना हादरवत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 02, 2025 | 01:03 PM
भररस्त्यात श्वानांची दहशत! चिमुकलीवर चढवला हल्ला, हाता-पायांना चावले अन् शेवटी फरफटत घेऊन गेले; भयावह Video Viral

भररस्त्यात श्वानांची दहशत! चिमुकलीवर चढवला हल्ला, हाता-पायांना चावले अन् शेवटी फरफटत घेऊन गेले; भयावह Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांनी केलेल्या एका भयानक हल्ल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रस्त्यावर खेळणाऱ्या एका निष्पाप 4 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात कुत्र्यांनी मुलीच्या हातांचा चावा घेतला आणि नंतर तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. घटना फार वेदनादायी असून यातील दृश्ये कुणाच्याही अंगावर काटा आणतील. आपल्यावर झालेल्या हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवायचे ते चिमुकलीला समजत नाही आणि ती जोरजोरात रडू लागते. श्वानांचा ग्रुप मात्र तिला फरफटत पुढे घेऊन जाऊ लागतो. यांनतर व्हिडिओत काय घडते ते जाणून घेऊया.

कुत्र्याच्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोल्डन हाईट्स कॉलनी, राजेंद्र नगरचा आहे. ज्यामध्ये एक मुलगी रस्त्यावर खेळत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी तरुणीवर हल्ला केला. दोन कुत्र्यांनी मुलीवर अशा प्रकारे हल्ला केला की त्यांनी तिचे हात ओरबाडले. यानंतर एका कुत्र्याने मुलीचा एक पाय जबड्यात पकडला आणि तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. यांनतर कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यादरम्यान मुलगी आरडाओरडा करू लागली. मुलीचा आवाज ऐकून शेवटी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बाहेर आले आणि त्यांनी मुलीकडे धाव घेतली.

तो गरीब आहे म्हणून त्याला त्रास देणार का? तरुणीचे साधूंसोबत गैरवर्तन, हाथ पकडून गयावया करू लागले; Viral Video

यानंतर नागरिकांनी श्वानांना तेथून पळवून लावले आणि चिमुकलीचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि आता हीच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला कुत्र्यांना पळवून लावताना आणि मुलीला हात धरून जमिनीवरून उचलताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की, मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला उभे राहण्यास आणि चालण्यास त्रास होत आहे. या संतापजनक घटनेने हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

#Hyderabad— Caught on #CCTV: A four-year-old girl suffered injuries after stray dogs attacked her at Golden Heights Colony, #Rajenderanagar here. The incident occurred on Friday, when the girl was playing on the road. Hearing the screams of the girl, the locals chased away… pic.twitter.com/szlLi4C1pB — NewsMeter (@NewsMeter_In) February 1, 2025

… म्हणून कधीही हार मानू नये! सापाने बेडकाला तोंडात पकडलं पण क्षणार्धातच असा उलटला डाव; थरारक Video Viral

श्वानांच्या या भयानक हल्ल्याचा व्हिडिओ @NewsMeter_In नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली असून व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जीएचएमसी कस्टमर केअर जी कुत्र्यांच्या धोक्याची नोंदणी करते ती अत्यंत दयनीय आहे. फक्त ते म्हणतात, जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा नोंदणी करा” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोल्डन हाइट्स कॉलनीमध्ये कुत्र्यांचा त्रास, डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. जीएचएमसीसह कोणीही त्याची दखल घेत नाही, खरोखरच दयनीय आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Street dogs attacked a girl playing on the road bit her hands and legs and then started dragging her away shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
1

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
2

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.