(फोटो सौजन्य: Twitter)
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. हा देशातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे ज्याला जगभरातील भाविक भेट देतात. या मेळ्यात आतापर्यंत लाखो लोक सामील झाले आहेत. येथील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. महाकुंभातील साधूसंत इथले मूळ आकर्षण बनले आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत अशातच आता इथला आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक मुलगी साधूंचा भररस्त्यात अपमान करताना दिसून आली. नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
महाकुंभमेळ्यातील अनेक वेगवगेळे बाबा सोशल मीडियावर व्हायरल झाले. आयआयटीयन बाबा, गोल्डन बाबा अशा अनेकांची फार चर्चा रंगली. यातच काटे वाले बाबा देखील एक आहेत ज्यांचा व्हिडिओ त्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता जो फार वादग्रस्त ठरला. त्यानंतर आता त्यांचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक तरुणी भररस्त्यात लोकांसमोर त्याच्याशी गैरवर्तन करताना दिसून आली. व्हिडिओ व्हायरल होताच आता नेटकरी तरुणीवर नाराज झाले असून आता सोशल मीडियावर तरुणींसाठी संताप व्यक्त केला जात आहे.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये काटे वाले बाबा जमिनीवर बसून दान केलेली रक्कम गोळा करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एक मुलगी उभी राहते आणि पैसे मागते. मुलगी म्हणते तुला पैसे कशाला हवेत. हे पैसे मला द्या. यावर बाबा सांगतात की, त्याच्या घरी मुलं आहेत पण मुलगी सतत त्याच्याशी वाद घालत असते. सोशल मीडियावर तरुणीच्या या कृत्याचा लोक निषेध करत आहेत. तसेच यूपी पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान हे काटे वाले बाबा गेल्या 50 वर्षांपासून काट्यांवर लाटण्याचा दावा करतात ज्यामुळे ते महाकुंभात एक चर्चेला विषय बनले.
महाकुंभ में कांटे वाले बाबा को परेशान किया जा रहा है
ये क्या बात हुई कि आप महिला सशक्तिकरण दिखाने के चक्कर में साधु संत पर कमेंट करोगे
आपको पैसे देना है तो दे दो नहीं तो मांग कोन रहा है आपसे ?
बाबा जी को बेकार में इन लोगों ने परेशान किया हैऔर कर रहे है#MahaKumbh #MahaKumbh2025 pic.twitter.com/3bTo6rGHVW— RAJNISH SUTHAR (@rajnishudaipur) January 20, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @rajnishudaipur नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘महाकुंभात काटा असलेल्या बाबांचा छळ होत आहे. महिला सशक्तीकरण दाखवण्यासाठी तुम्ही एका संतावर भाष्य कराल काय हरकत आहे?पैसे द्यायचे असतील तर द्या नाहीतर तुमच्याकडे कोण मागणी करत आहे? या लोकांनी बाबाजींना उगाच त्रास दिला आणि अजूनही देत आहेत’ असे लिहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तिची भाषा खूप वाईट आहे, ती फक्त व्हिडीओसाठी काहीही करायला तयार आहे, द्वेष करणाऱ्यांनी अशा ठिकाणी जाऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी असतो तर या तरुणीच्या कानाखाली लगावली असती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.