मुंबईत पुन्हा वेगाचा कहर! भरधाव कारने पायी जाणाऱ्या दोघांना चिरडले, क्षणात हवेत उडाले अन् जागीच... थरारक Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक थरारक घटना आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. आपण कधीही न पाहिलेले दृश्ये यात दिसून येते. हे व्हायरल व्हिडिओज अनेकदा लोकांची झोप उडवतात तर कधी यातील दृश्ये पाहून लोक हादरतात. सध्या देखील इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे, ज्यात एका रस्ते अपघाताचे भीषण दृश्ये दिसून आले. ही घटना मुंबईतील असून आता ती वेगात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
नवी मुंबईतील तळोजा MIDC परिसरात हिट अँड रन अपघात घडून आला ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यात भरधाव वेगात येणाऱ्या कारने दोघांना चिरडल्याचे दिसून येत आहे. अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच यात आणखीन एका घटनेचा समावेश झाला. लोक गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करत नाहीत आणि यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओतही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये फार थरारक आणि दुर्दैवी आहेत जी पाहून लोक आता घटनेवर हळहळ व्यक्त करत आहेत.
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला रस्त्याच्या कडेला चालत होती आणि एक तरुणही त्याच वाटेने जात होता. अचानक मागून भरधाव वेगात एक कार येते आणि दोघांनाही इतकी जोरात धडकली की ते लांबवर जाऊन पडतात. या अपघातात 27 वर्षीय लालू दास यांचा जागीच मृत्यू झाला, तर 44 वर्षीय प्रमिला दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्या जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहेत.
A tragic road accident in Navi Mumbai’s Taloja MIDC area left one person dead after a car ran over two individuals.
The driver has been detained by the police. #Accident #NaviMumbai #Maharashtra #India#RoadSafety pic.twitter.com/tCbJaVrnkL
— Siraj Noorani (@sirajnoorani) January 14, 2025
दरम्यान या थरारक अपघाताचा व्हिडिओ @SayedAfsarImam2 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणी आरोपी कार चालकाला तळोजा पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.