(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अनेकवेळा लग्नसमारंभात काही विचित्र घटना घडतात, ज्यामुळे सगळेच हैराण होतात. लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही. आता लग्नसमारंभात मजेदार नात म्हणजे, मेव्हणी आणि नवऱ्या मुलात होणारी मिश्किल मस्करी. मात्र सावध व्हा, कारण आजकाल हे नातं आता वेगळंच वळण घेत आहे. आम्ही असं का म्हणत आहोत, याचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल.
अलीकडेच, सोशल मीडियावर लग्नसमारंभातील एक धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे. यातील दृश्ये तुम्हाला क्षणार्धात थक्क करून सोडतील. यात एका मेव्हणी चपळतेने आपल्याच भावजींचे चुंबन घेताना दिसून आली. मुख्य म्हणजे, ही सर्व घटना चालू लग्नसोहळ्यावेळी भरमंडपात घडून आली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तींने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आणि शोषक मीडियावर शेअर केला. व्हिडिओ शेअर होताच लोक यातील दृश्ये पाहून हादरले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर होऊ लागला. आता यात सर्व गोष्टी नक्की कशा घडून आल्या आणि नेमकं काय, कसा घडलं या सर्व गोष्टींविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या वेळी स्टेजवर बसले आहेत आणि पाहुण्यांसोबत फोटो काढत आहेत. या दरम्यान, वधूची बहीण, फोटो काढण्यासाठी नवऱ्या मुलाच्या बाजूला जाऊन बसते आणि पुढच्याच क्षणी त्याला जोरदार पकडून त्यांचे चुंबन घेऊ लागते. अचानक घडलेला हा सर्व प्रकार पाहून वर आणि वधू तसेच उपस्थित सर्व पाहुणे आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते. विशेषत: वधूची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सर्वांचे लक्ष याकडे वेधले गेले. बहिणीच्या या कृतीने वधू पूर्णपणे हादरलेली दिसली. पाहुण्यांचाही या असामान्य घटनेवर विश्वास बसत नव्हता. हे काय चालले आहे, असा प्रश्न सर्वांना पडला. घटनेत पुढे काय होते हे मात्र व्हिडिओत दाखवण्यात आले नाही मात्र या व्हिडिओची मजा युजर्स पुरेपूर लुटत आहेत आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहेत.
काय सांगता! आता पुणे मेट्रोने जाता येणार स्वर्गात? रेल्वे स्थानकावरील धक्कादायक Photo Viral
हा व्हायरल व्हिडिओ @butterfly__mahi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पहिल्याच दिवशी भांडण” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा मेव्हण्या नक्की कुठे भेटतात?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.