(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होतात तर कधी अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होतात तसेच इथे काही मारामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक पोलीस अधिकारी एका महिलेची लाथा-पायांनी मारहाण करताना दिसून येत आहे.
पोलिसांचे काम आहे जनतेची मदत करणं, ज्यासाठी त्यांना विशेष अधिकार दिले जातात मात्र याच अधिकारांचा काहीजण गैरवापर करताना दिसून येतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून आले. यात एक पोलीस अधिकारी चालू ट्रेनमध्ये एका महिलेला मारताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर होताच तो वेगाने व्हायरल झाला. यातील दृश्ये पाहून अनेकजण हादरले असून नक्की यात काय घडले ते आपण जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, सदर घटना ही 14 जानेवारी रोजी रणथंबोर एक्सप्रेसमध्ये घडून आली. तर झाले असे की, ट्रेनमध्ये अचानक कोणीतरी साखळी खेचून ट्रेन थांबवली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आरपीएफ कॉन्सटेबल ओम प्रकाश ट्रेनच्या डब्यात शिरले. दरम्यान ट्रेन थांबवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना काही प्रवाशांसोबत त्यांचा वाद होऊ लागला आणि या बचाबचत रागाच्या भरात त्यांनी एका महिलेच्या थोबाडीत लगावल्या. मात्र आता ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता नवीन चर्चेचा विषय बनली आहे.
ट्रेन के जनरल कोच में यात्रा कर रही थी महिला, ये वर्दी वालों का रौब और हाथ कमजोरों पर ही क्यों चलता है हमेशा?
सवाई माधोपुर आरपीएफ थाने में तैनात हेड कॉन्स्टेबल ने महिला को जड़ा थप्पड़ !!
वीडियो सोशल मीडिया पर हो रहा है वायरल !!
वीडियो सामने आने के बाद रेलवे ने हेड कॉन्स्टेबल… pic.twitter.com/PjbKydS7Mz
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) January 16, 2025
पोलिसांची ही दादागिरी पाहून आता नेटकरी मात्र फार संतापले असून सदर पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करू लागले. यानंतर राजस्थान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत गांभिर्यानं नोंद घेत या ओम प्रकाश याला नोकरीवरून सस्पेंड केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बडतर्फीनंतर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करावी, निलंबनाने काहीही होणार नाही आणि नंतर पुन्हा कामावर घेतले जाईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा लोकांनीच पोलीस खात्याची बदनामी केली आहे, मला कळत नाही की त्यांच्यात एवढा घमेंड का आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.