जंगलाचा नियम कुणाला चुकलाय? राजालाही सोडले नाही, जिवंत शरीर असे फाडले की... थरारक शिकारीचा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी थरारक अपघाताचे. तसेच इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील काही व्हिडिओज शेअर केले जातात, यात अधिकतर प्राण्यांमधील लढतीचे दृश्ये दिसून येते. बऱ्याच वेळा प्राण्यांच्या या लढती इतक्या थरारक असतात की पाहून सर्वच हादरून जातात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात नाक्कीची काय घडले ते जाणून घेऊयात.
आता प्राण्यांच्या जीवनाविषयी जाणून घ्यायचे म्हटले की, जंगलाच्या राजाचा विषय आलाच. सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि बलवान प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या जीवघेण्या शिकारीमुळे आणि ताकदीमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. त्याच्या पुढे कोणत्याही प्राण्याचे काही चालत नाही. प्राणीच काय तर माणसंही सिंहाला घाबरून असतात. आता सोशल मीडियावर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेर ज्यात त्याने केलेल्या काही थरारक शिकारीचे दृश्ये दिसून आले मात्र सिंहानीच दुसऱ्या सिंहाची शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? हे दृश्य सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले आहे, जे पाहून आता अनेक युजर्स हादरले आहेत.
“मला आता यमराज हवा”! आजीच्या उत्तरावर सोशल मीडिया हादरलं, पण प्रश्न काय? मजेदार Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक सिंह जखमी अवस्थेत दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी दोन सिंह या जखमी सिंहाला पकडून त्याची शिकार करत असल्याचे भयावह दृश्य दिसते. दोन्ही सिंह जखमी सिंहाला ओढतात आणि त्याच्या शरीराचा चावा घेऊ लागतात . यावेळी यात तुम्ही सिंहाचे रक्तबंबाळ शरीर आणि त्याची हतबलता स्पष्टपणे पाहू शकता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून सिंहाच्या शिकारीचा हा थरार पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत.
सिंहाच्या या थरारक शिकारीचा व्हिडिओ @latestkruger नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “म्हणजे ते त्यांचे प्रकार देखील खातात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते त्याला जिवंत खात आहेत का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.