two women policemen ride a scooty without a helmet in mumbai the picture went viral and the traffic police nrvb
मुंबई : जेव्हाही आपण बाईकवरून (Bike) कुठेतरी जातो तेव्हा एक गोष्ट सोबत घ्यायला विसरू नये आणि ती म्हणजे हेल्मेट (Helmet). हेल्मेट बाळगण्यामागे दोन कारणे आहेत, एक म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितता (Own Safety) आणि दुसरे म्हणजे दंड (Fine) टाळणे. कारण ड्रायव्हिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (As Per Driving Guidelines) दुचाकी चालवताना हेल्मेट घालूनच (Ride a two wheeler wear helmet compulsory) वाहन चालवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास दंड आकारला जातो.
पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही औरच सांगत आहे. ज्यामध्ये कायद्याचे पालन करणारे कर्मचारीच नियमांची पायमल्ली करताना दिसतात. वास्तविक राहुल बर्मन नावाच्या एका ट्विटर यूजरने त्याच्या हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. मुंबईत शूट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
[read_also content=”२ मुलींनी हातात सिगारेट घेऊन गायले राष्ट्रगीत मग काय झालं ते तुम्हीच वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/shocking-viral-video-2-girls-sing-national-anthem-with-cigarette-in-hand-fir-lodged-nrvb-383388.html”]
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दोन महिला पोलीस हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना बर्मन यांनी स्कूटरचा नंबरही शेअर केला आहे. यासोबत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर आपण असा प्रवास केला तर? हे वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही का?
[read_also content=”११ एप्रिल २०२३ : मीन राशीच्या बाजूने आज निकाल येईल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होईल https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-rashibhavishya-11-april-2023-the-result-will-be-in-favor-of-pisces-everything-will-be-fine-in-your-personal-life-read-horoscope-in-marathi-nrvb/”]
MH01ED0659
What if we travel like this ?? Isn't this a traffic rule violation ?@MumbaiPolice @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/DcNaCHo7E7— Rahul Barman (@RahulB__007) April 8, 2023
विशेष म्हणजे, युजरने शेअर केलेल्या या फोटोला मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रिप्लाय देण्यात आला आहे. पोस्टला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले की, “आम्ही आवश्यक कठोर कारवाईसाठी हे माटुंगा ट्रॅफिक सर्कलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत शेअर केले आहे.”