Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडला व्यक्ती, हेल्मेट काढून बघताच बाहेर निघाला भयावह जीव; Video Viral

Shocking Incident Viral: व्यक्तीला अचानक बेशुद्ध झाल्याचे पाहून लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सुरुवात केली मात्र त्याचे हेल्मेट उघडून पाहतच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2024 | 10:30 AM
स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडला व्यक्ती, हेल्मेट काढून बघताच बाहेर निघाला भयावह जीव; Video Viral

स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडला व्यक्ती, हेल्मेट काढून बघताच बाहेर निघाला भयावह जीव; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे कधी स्टंट्सचे तर कधी अपघाताचे व्हिडिओ तर कधी हास्यापद व्हिडिओ देखील शेअर केले जातात. बऱ्याचदा इथे काही धक्कादायक आणि विचित्र गोष्टींचे व्हिडिओ देखील शेअर होतात, ज्यांना पाहून आपल्याला धक्का बसेल. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात एका व्यक्तीबरोबर एक थरारक घटना घडून आल्याचे दिसून आले. नक्की व्हिडिओत असे काय घडले? ते चला जाणून घेऊयात.

मानवी वस्ती विकसित झाल्यांनतर शहरातून अनेक प्राणी नाहीसे झाले, पण तरीही कधी कधी आपल्या नकळत आपल्याला हे प्राणी दिसून येतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. ही घटना दक्षिण भारतात घडली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यात एक व्यक्ती स्कुटी चालवत असताना अचानक चालू रस्तावर बेशुद्ध पडतो. यानंतर त्याला काय झाले हे पाहण्यासाठी आजूबाजूची लोक त्याच्या दिशेने धाव घेतात आणि त्याचा हेल्मेट काढून बघतात. हेल्मेट काढताच त्याच्या अपघाताचे कारण समोर येते जे पाहून सर्वच लोक हादरून जातात. खरं तर, व्यक्तीच्या हेल्मेटमध्ये किंग कोब्रा लपून बसलेला असतो. त्या व्यक्तीने सापासोबत हेल्मेटही घातले आहे. ज्यामुळे सापाने दंश करताच तो रस्त्यात बेशुद्ध होऊन पडतो.

चालू फेऱ्यांमध्ये पंडित जी भडकले, केलं असं काही की… पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral

काय घडले व्हायरल व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की, स्कूटर चालवताना व्यक्ती बेशुद्ध पडते. काही लोक त्याला उचलतात आणि लगेच गाडीत घेऊन जातात. त्याचे हेल्मेट काढल्यानंतर त्यामध्ये कोब्राचे बाळ लपल्याचे आढळून आले ज्याने त्या व्यक्तीच्या डोक्याला चावा घेतला आहे. हेल्मेटच्या आत कोब्रा असतो. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, बेबी कोब्रा कोब्रा सापापेक्षा जास्त विषारी आहे. त्यामुळे अनेकदा हेल्मेट, शूज किंवा इतर कोणतीही वस्तू पूर्णपणे नीट तपासल्यानंतरच त्यांना घालण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचं झालं असं की, एका स्थानिक व्यक्तीने ऑफिसमध्ये हेल्मेट घालून ठेवलं होतं. संध्याकाळी घरी परतत असताना त्याने हेल्मेट घातले तेव्हा त्याला काही हालचाल जाणवली. त्यांना या सापाचा आधीच संशय असल्याने त्याने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. प्रोफेशनल हँडलर्सने पाहिले तेव्हा आतून एक विषारी बेबी कोब्रा निघाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला असून यातील दृश्ये पाहून आता अनेक युजर्स आवाक् झाले आहेत.

यह दक्षिण भारत का वीडियो है एक कोबरा का बच्चा हेलमेट में छुपा हुआ था और व्यक्ति के सर में काट लिया !!
जब भी आप हेलमेट पहने तो एक बार हेलमेट को ठोक कर झाड़ कर ही पहने !!#ViralVideos #Helmet #Viral pic.twitter.com/8PnRKdMXjo
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) December 24, 2024

अंगातली मस्ती जीवावर बेतली! चालू ट्रेनच्या छतावर चढून करत होता स्टंट, तितक्यात बसला इलेकट्रीक शॉक अन्… Video Viral

या भयावह घटनेचा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो जिवंत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्यासोबतही असेच घडले होते, गोवर किड्याने मला दोनदा हेल्मेटमध्ये चावले होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Venomous baby cobra was hidden in helmet bites on head video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

शेवटी ती पण एक आईच आहे…! मुलाला वाचवण्यासाठी खारुताई सापाशी भिडली, हाताने पकडला फणा अन्… थरारक Video Video
1

शेवटी ती पण एक आईच आहे…! मुलाला वाचवण्यासाठी खारुताई सापाशी भिडली, हाताने पकडला फणा अन्… थरारक Video Video

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral
2

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral

गर्दीचा फायदा घेत महिलेने दुकानातून केली चोरी, पकडले जाताच लोकांनी केली बेदम मारहाण; Video Viral
3

गर्दीचा फायदा घेत महिलेने दुकानातून केली चोरी, पकडले जाताच लोकांनी केली बेदम मारहाण; Video Viral

जीवाशी खेळ! चालू ट्रेनमधून पुलावर उतरला अन् धावतच सुटला… ट्रेनसोबत लावली अनोखी शर्यत; अंगावर शहारे आणणारा Viral Video
4

जीवाशी खेळ! चालू ट्रेनमधून पुलावर उतरला अन् धावतच सुटला… ट्रेनसोबत लावली अनोखी शर्यत; अंगावर शहारे आणणारा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.