(फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर स्वत:ला व्हायरल होण्याचे भूत लोकांच्या मनात भिरभिरत आहे की लोक यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. आपला जीव धोक्यात घालून सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालतात आणि नको ते करायला बघतात. बऱ्याचदा असे हे रिल्स व्हायरल होतात तर काही जीवावर बेततात. असाच काहीसा एका मुलासोबत घडल्याचे सध्या दिसून आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तरुणाला त्याची मस्ती कधी महागात पडते ते दिसून येत आहे.
सोशल मीडियावर नेहमीच थरारक स्टंट्स, भयावह घटना आणि थक्क करणाऱ्या अपघातांसंबंधित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही अशाप्रकारचे व्हिडिओज नक्कीच कधी ना कधी पाहिले असावेत. सध्या देखील इथे एक असाच प्रकार व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुण चक्क चालू ट्रेनच्या छतावर चढून स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा हा स्टंट पाहून अनेकांना धडकी भरली. आपला जीव धोक्यात घालून फक्त काही शुल्लक लाइक्ससाठी आणि प्रसिद्धीसाठी तो असे करू पाहत होता मात्र घडते काही भलतेच. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
बिबट्याने हल्ला चढवताच माकडाने बोलावली संपूर्ण टोळी, मग जे झालं… पाहून उडेल थरकाप; Video Viral
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा चालत्या ट्रेनच्या छतावर चढताना रील बनवताना दिसत आहे. त्याचा मित्र त्या मुलाचा व्हिडिओ शूट करत आहे. मुलगा ट्रेनच्या खिडकीतून छतावर चढताना दिसतो. ट्रेनच्या छतावर चढून तो मुलगा स्वत:ला एका मोठ्या स्टंटमॅनपेक्षा कमी समजत नव्हता. हवेत हात उंचावून तो ट्रेनच्या छतावर चढण्याचा आनंद साजरा करत होता. मात्र काही वेळाने मुलाचा हात रेल्वे रुळावरून जाणाऱ्या हाय टेंशन वायरला लागला आणि पुढच्याच क्षणी त्याला जोरदार विजेचा झटका बसतो. विजेचा झटका बसताच तो ट्रेनमधून खाली पडतो. मुख्य म्हणजे यात मुलाचा जीव वाचला आहे पण आता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून व्हिडिओच्या शेवटी त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, म्हणजेच त्याने जे काही केले त्याचा त्याला पश्चाताप झाला असावा.
देखिए Reels के चक्कर में जान को दाव पर लगा दिया, खैर जान बच गई !!
ट्रेन की छत पर बैठकर रील बना रहा था ,, इलेक्ट्रिक शॉर्ट लगा अब हॉस्पिटल में बैठा रो रहा है !!
वीडियो अंत तक देखे 🤣🤣 #ViralVideo #instagramreels #instagramreel pic.twitter.com/CQpcknisO3— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) December 25, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रिल्सच्या नादात जीव धोक्यात टाकला पण जीव वाचला, ट्रेनच्या छतावर बसून रील बनवत होतो, इलेक्ट्रिक शॉर्ट लागला आणि आता हॉस्पिटलमध्ये बसून रडतोय’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तरुणीच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “रील जास्त महत्त्वाची आहे, जीवनाची किंमत काय आहे, पुन्हा पुनर्जन्म होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा लोकांना आजीवन रेल्वेने प्रवास करण्यास बंदी घातली पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.