'वर पाहिजे...', पण 'ही' अट मान्य करावीच लागेल; जाहिरात सोशल मीडियावर चर्चेत
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. अलीकडे ऑललाइन डेटिंग ॲप्स तसेच सोशल मीडियावरील लग्नाच्या जाहिरात खूपच चर्चेत असतात. तसेच वृत्तपत्रामध्ये देखील आपल्याला अशा जाहिराती पाहायला मिळतात. सध्या अशीच एक वृत्तपत्रातीलच जाहिरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
ही जाहिरात पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या जाहिरातीत एका 30 वर्षीय तरुणीने अशा अपेक्षा सांगितल्या आहेत की, तुम्हाला हसू आवरणार नाही. यामुलीच्या अपेक्षा इतर मुलींप्रमाणेच आहेत पण दोन अटी अशा आहेत की, तुम्ही चकित व्हाल. मात्र ही जाहिरात कधीची आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. चला पाहूयात काय अपेक्षा आहेत या मुलीच्या-
तर या 30 वर्षीय तरुणीने आपल्या अपेक्षेत सांगितले आहे की, मुलगा देखणा असावा, तसेच मुलगा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक असावा, याशिवाय मुलाकडे किमान 20 एकरमध्ये फार्महाउस असावे. तसेच तो 25-28 वर्षाचा असावा, त्याचा स्वत:चा व्यवसाय असावा. तसेच त्याला स्वयंपाकही यायला हवा आणि महत्त्वाची अट म्हणजे तो पादणारा नसावा, ढेकर देणाराही नसावा अशा अटी तरुणीने नमूद केल्या आहेत. ही जाहिरात सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. या अटी वाचून नेटकरी आश्चर्यचिकत झाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पोस्ट
30-year-old feminist woman, working against capitalism requires a 25-year-old wealthy boy with a well-established business.
Koi Ho tou batana 😀 pic.twitter.com/7YVPnmMMfT
— Rishi Bagree (@rishibagree) November 24, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेली पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @rishibagree या अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘कोणी असेल तर सांगा’ असे लिहिले आहे. या पोस्टला आत्तापर्यंत हजारोहूंन अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, झेप्टोने 10 मिनिटांत तिला तिचा वर शोधून दिला पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अरे नैसर्गिक प्रक्रियेला ती नाही कशी म्हणू शकते. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर मिम्स शेअर केल्या आहेत. याशिवाय अनेकांनी तुम्ही बरेबर आहात दीदी असे म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.