फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आश्चर्य वाटते तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होते. तुम्ही सोशल मीडियावर डान्स, रिल्स, जुगाड, स्टंट तसेच भांडणांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. याशिवाय लग्न समारंभातील देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेक वरातींतचे भन्नाट असे व्हिडिओ बघितले असतील, कधी वरातीच्या एनट्रीचा व्हिडिओ व्हायरल होतो. तर कधी वरातीत नाचणाऱ्या लोकांचा व्हिडिओ. मात्र हा व्हिडिओ काही वेगळाच आहे. या वरातीत नवरा मुलगा वरात सोडून चक्क पळून गेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडिओ मेरठमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.
नेमकं काय घडले?
व्हिडिओच्या कॅप्शवरुन असे लक्षात येते की, नवरा मुलगा ज्या ट्रकमध्ये चढला आहे त्या मिनी ट्रक चालकाने पैसे पळवले होते. यामुळे नवरा मुलगा लग्न समारंभातील विधी सोडून त्या चोराच्या मागे धावतो. तो धावत्या ट्रकमध्ये चढतो आणि नंतर ट्रक थांबवून त्या ट्रकचालकाशी भांडू लागतो. ट्रक चालकाने फक्त 2000 रुपयांची नोट चोरलेली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर हशा पिकला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.
व्हायल व्हिडिओ
#मेरठ में दुल्हा घुड़चढ़ी पर था. उसकी नोटों की माला से एक चोर नोट खींचकर भागा
शादी की रस्में छोड़कर दुल्हा चोर के पीछे भागा. चोर ने लोडर स्टार्ट किया और निकलने लगा. दौड़ते लोडर में खिड़की से दूल्हे ने एंट्री मारी तो चोर लोडर छोड़ भागने लगा
दूल्हे ने चोर पकड़ा और जमकर धुनाई की pic.twitter.com/7liYToncMP
— Narendra Pratap (@hindipatrakar) November 24, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @hindipatrakar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नवरा जेम्स बाँड निघाला, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भावाने एका नोटेसाठी बॉलीवूडच्या ॲक्शन चित्रपटालापण फेल केलं. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नवरीचे पुढचे भविष्य सुरक्षित आहे. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.