फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेकदा संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर झाला आहे. एक तरुणीचा स्कर्ट भररस्त्यात फाटला अन् मित्राने असे काही केले आहे की, तुम्ही देखील परत एखाद्या मुलाशी मैत्री करताना दहा वेळा विचार कराल.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे म्हणतात देवाने सगळी नाती आधीच ठरवून पाठवली आहेत मात्र मैत्री हे एकट नाते आहे की, जे आपण निवडू शकतो. कोणाशी मैत्री करायची कोणाशी नाही हे आपल्या हातात आहे.असे म्हणतात की वेळप्रसंग्री जो आपल्यासाठी धावून येऊल तोच खरा माणूस, मग तो आपला मित्र का असेना. तसेच मुलींचा आदर करणारा देखील खरा माणूस असतो. या व्हिडिओत पाहिल्यावर तुम्हाला हे देखील लक्षात येऊल की माणुसकी देखील अजून जिवंत आहे.
नेमकं काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकती की, एका बस स्टॉपवर काही लोक वाट बघत बसलेले आहेत. तिथेच एक तरुण आणि तरुणी येतात आणि एका बेंचवर गप्पा मारत बसतात. काही लोक तिथे गाडीची वाट बघत असतात. काही वेळाने दोन्ही तरुण-तरुणी जाण्यास उठतात. त्याच वेळी अचानक त्या तरुणीचा स्कर्ट फाटतो. तिच्या लक्षात येताच ती घाबरते. मात्र तरुण तिला मदत करायचा सोडून तिच्यावर हसत बसतो. तिथे उभी असलेली माणसांना कळताच तिला काय झाले विचारतात. तेव्हा एक माणूस तिला मदत करतो. कशाचाही विचार न करता तो स्वत: तिला त्याची लुंगी काढून देतो. मात्र तो तरुण तरीही तिच्यावर हसतच असतो. त्यांच्या बोलण्यावरुन ते कदाचित मित्र असावे असे वाटते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर the.laugh.villa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांशी मैत्री करायचीच नाही, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, माणुसकी अजूनही जिवंत आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्या माणसाने मुलीली मदत केली त्याला सॅल्युट. आणखी एकाने म्हयले आहे की, तो माणूस गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत आहे. तर त्या तरुणाला अनेकांनी ट्रोल केले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.