'Good Kisser' कॅब ड्राव्हरला मिळालेला असा रिव्ह्यू तुम्ही ऐकला नसेल; पोस्ट तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड आणि असे अनेक मजेदार आश्चर्यकारक अशा गोष्टी व्हायरल होत असतात. तसेच अलीकडे तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत. तुम्हाला कुठे जायचे असेल, काही शॉपिंग करायची असेल तर ते तुम्ही घरबसल्या करु शकता. कुठे जायचे झाल्यास तर तुम्ही ऑनलाईन कॅब बुक करु शकता.
कॅब बुक केल्याच्या 15 ते 20 मिनिटांत कॅब तुमच्या घराच्या दरवाज्यापर्यंत तुम्ही जिथे असाल तिथे येते. तसेच तुम्हाला तुमच्या जायच्या ठिकाणी सोडते. तसेच आता तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर कॅब ड्रायव्हरला तुमचा रिव्ह्यू देऊ शकता.तुमचा अनुभव शेअर कराता. तुम्ही असे अनेक रिव्ह्यू वाचलसे असतील. अनेकदा मजेशीर रिव्ह्यू देखील यामध्ये असताता. सध्या अशाच एका रिव्ह्यूची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चांगला किस करतो..
तुम्ही जेव्हा कॅबने प्रवास करता आणि नंतर त्या कॅब ड्रायव्हर ला रिव्ह्यू देता तो सहसा असा की, आरामदायी राईड, कार चांगली होती, किंवा ड्राव्हरने वेळेत पोहोचवले असे. पण एक महिलेने काही वेगळाच रिव्ह्यू दिला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
तुम्ही पाोस्टमध्ये पाहू शरकता की, एका उबर कॅब ड्रायव्हरच्या प्रोफाईलचा रिव्ह्यू दिसत आहे. या कॅब ड्रायव्हरचे नाव मोहमद असून त्याने आत्तापर्यंत 10 हजार ट्रिप्स पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याला पाच स्टारपेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये त्याला दिलेला एक रिव्ह्यू देखील दिसत आहे. यामध्ये तो एक चांगला किसर असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पोस्ट
Mohammed moving kinda crazy pic.twitter.com/mgez4vByzL
— s (@s20_a_) December 9, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एक्सवर @s20_a_या अकाऊंटर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये Mohammed moving kinda crazy” असे लिहिले आहे. या पोस्टवरुन लक्षात येते की, हा रिव्हू आठ वर्ष जुना आहे. सध्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेकांच्या मनात प्रश्न आला आहे की, त्या राइडमध्ये काय झाले असेल. एका युजरने म्हटले आहे की, चांगल्या रिव्ह्यूसाठी काहीही. असे म्हटले आहे. अनेकजणांनी आश्चर्यचकित झाल्याचे इमोजी शेअर केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.