
प्रेम की वेडेपणा? ग्रॅज्यूएशनचा आनंद साजरा करत महिलेने 14 फूट मगरीसोबत केले अनोखे फोटोशूट, पाण्याच्या राक्षसाचे घेतले चुंबण
मगरीसोबत फोटोशूट
मिळालेल्या माहितीनुसार, ही मगर तब्बल १४ फूट लांब होती. मॅकनीस स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी कॅट डेलीने हे अनोखे फोटोशूट केले ज्याची चर्चा आता इंटरनेटवर रंगत आहे. आपला नेव्ही ब्लू गाऊन घालून, तिने थेट पाण्यात उडी मारली आणि आपली पदवीची टोपी ‘बिग अल’ नावाच्या १४ फूट लांब मगरीच्या नाकावर ठेवली. यातही सर्वात धक्कादायक प्रकार तेव्हा घडला जेव्हा तिने त्या मगरीचे चुंबण घेऊ पाहिले. तरुणीच्या हिमतीची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. तर हे देखील लक्षात घ्यायला हवे की, कॅटने शेअर केलेल्या सर्वच फोटोजमध्ये मगर चांगलीच खुश दिसत आहे. मगरीने कॅटवर हल्ला न करत तिच्या या शूटमध्ये तिची साथ दिली जे खरंच अविश्वसनीय आहे.
खरंतर कॅट कुणी नवखी नाही, ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत ‘गेटर कंट्री’ नावाचा रेस्क्यू पार्क चालवते. कॅटला ७ वर्षांपासूनच जंगली जनावरांसोबत राहण्याची सवय आहे. तिचे ध्येय फक्त हे सांगणे होते की, आपण मगरीला जितकी धोकादायक समजतो तितकी धोकादायक ती नाहीये. दरम्यान हे सर्व फोटोज @katdaley919 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स करत या फोटोशूटवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खोटं बोलणार नाही, हे जबरदस्त आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नाही, पण तो मगर खूपच गोड वाटतोय, अभिनंदन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरंच धोकादायक आहे, कृपया असे काहीही करू नका, जेणेकरून तुमचा जीव धोक्यात येण्याची शक्यता कधीही राहणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.