Viral video Crow playing football with child video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. प्राण्यांचे पक्षांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. कधी प्राण्यांचे शिकार करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, तर कधी प्राण्यांच्या प्रणयाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. सध्या एक पक्षाच्या वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत. अनेकजणांना समोर जे दिसत आहे, त्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.
यामध्ये एक कावळा चिमुकल्यासोबत खेळताना दिसत आहे. यापूर्वी देखील एक कावळा बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. यामध्ये एक कावळा चिमुकल्यासोबत आनंदाने खेळताना दिसत आहे. चिमुकला एक छोटा बॉल पायाने कावळ्याच्या दिशेने फेकत आहे, तर कावळा तो बॉल चोचीने चिमुकल्याकडे फेकत आहे. दोघेही घराच्या अंगणात खेळत आहे. तुम्ही पाहू शकता की, एक छोटासा गुलाबी रंगाचा फुटबॉल खेळताना चिमुकला आणि कावळा दिसत आहेत. चिमुकला अगदी हळुवारपणे पायाने बॉल कावळ्याकडे मारत आहे, तर कावळ चोचीने मुलाकडे बॉल मारत आहे. हा गोंडस आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chakdefootball या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यव्यक्त केले आहे. एका युजरने क्रोनाल्डो असे कावळ्याला नाव दिले आहे. दुसऱ्या एका युजरने कावळ्याला रविवारी वेळ आहे का? आमच्याकडे मॅच आहे आणि स्टाइकरची गरज आहे. असा प्रश्न केला आहे. तर आणखी एका युजरने किती क्यूट असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.