Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

६ फेब्रुवारी रोजी कर्जत लोकलच्या महिला डब्यात बुर्का परिधान करून प्रवास करणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी (GRP) नाशिकमधून अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 09:47 PM
मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश (Photo Credit- IANS)

मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश (Photo Credit- IANS)

Follow Us
Follow Us:

  • मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश
  • पोलिसांनी असा लावला छडा
  • मध्य रेल्वेचे पुरुष प्रवाशांना कडक आवाहन
Burqa Man in Ladies Coach News: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी कर्जत लोकलच्या महिला डब्यात बुर्का परिधान करून प्रवास करणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी (GRP) नाशिकमधून अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून आरोपीचा शोध घेतला जात होता.

महिला प्रवाशांना चकमा देऊन झाला होता फरार

मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी कर्जत लोकलच्या लेडीज सेकंड क्लास डब्यात एक संशयास्पद व्यक्ती बुर्का घालून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या लक्षात आले. घाटकोपर स्थानक येताच महिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अत्यंत चलाखीने प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला उडी मारून गर्दीचा फायदा घेत फरार झाला होता. या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड

सीसीटीवी फुटेज ठरले निर्णायक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (CSMT) मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घाटकोपर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली आणि तांत्रिक तपासाद्वारे त्याचा माग काढत पोलिसांनी त्याला नाशिकमधून ताब्यात घेतले. अल्ताफ हुसैन शेख (५७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नाशिकचा रहिवासी आहे.

आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती

पोलीस चौकशीदरम्यान एक वेगळी माहिती समोर आली आहे. आरोपी अल्ताफ शेख हा गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त असून २०२२ पासून त्याच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी घाटकोपर रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले आहे.

मध्य रेल्वेचे पुरुष प्रवाशांना कडक आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुरुष प्रवाशांना कडक इशारा दिला आहे. “पुरुष प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात प्रवेश करू नये. असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे कायद्यांतर्गत कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, प्रवाशांना अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित रेल्वे कर्मचारी किंवा हेल्पलाईन क्रमांक १३९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

Web Title: Man arrested for entering mumbai local train wearing burqa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Burkha
  • Mumbai
  • Mumbai local train
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट
1

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
2

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
3

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
4

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.