तरुणाने मेकअप करून स्वतःला Michael Jackson बनवले अन् व्हिडिओ पाहून सर्वच हादरले
मायकल जॅक्सन हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घेतले तरी मायकलचा चेहरा लगेच लोकांच्या डोळ्यासमोर येतो. आपल्या नृत्याने मायकलने जगभरातील लोकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आणि प्रसिद्धी मिळवली. मायकल हा जितका आपल्या पॉप डान्ससाठी ओळखला जात होता तितकाच तो आपल्या प्लास्टिक सर्जरीसाठीदेखील चर्चेत होता. असे सांगितले जाते की मायकलला आपला चेहरा कधीही आवडत नसायचा, ज्यामुळे आपला चेहरा सुंदर बनवण्यासाठी त्याने आपल्या चेहऱ्यावर अनेक सर्जरीज करून घेतल्या. याच कारणामुळे तो कमी वयातच मृत्यूच्या दारी पोहचला.
मायकलच्या आज आपल्यात नसला तरीही त्याच्या फॅन्सच्या मनात तो आजची जिवंत आहे. सध्या एका कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा @gusjackson1975 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. खरं तर, हा व्हिडिओ इतका अप्रतिम आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रतिभेची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. यामध्ये एक व्यक्ती मेकअपच्या माध्यमातून स्वत:ला मायकल जॅक्सनसारखा हुबेहूब लुक देताना दिसत आहे. मेकअपनंतर व्यक्तीचा चेहरा पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्या व्यक्तीला खरा मायकल जॅक्सन समजाल.
हा व्यक्ती Gus Jackson नावाने सोशल मीडियावर प्रचलित आहे. मेकअपच्या मदतीने तो आपल्याला मायकल जॅक्सनचा लूक देतो. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून आता लोक थक्क होत आहेत. माहितीनुसार, गुस्तावो किशोरवयात असताना त्याने मायकल जॅक्सनची नक्कल करायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यामुळे तो आज लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तो एक कलाकार आहे, त्याने अनेक चित्रपटांमध्ये मायकल जॅक्सनची भूमिकाही साकारली आहे.
हेदेखील वाचा – दिवसभर पंखा चालवा 1 रुपयाही बिल येणार नाही, तरुणाचा हटके जुगाड होतोय Viral
2009 मध्ये किंग ऑफ पॉपच्या मृत्यूनंतर, त्याची लोकप्रियता इतकी वाढली की त्याला वेगवेगळ्या देशांमध्ये मागणी होऊ लागली. 24 मार्च 2018 रोजी स्पेन येथे आयोजित समारंभात Mjvibe.com या वेबसाईटद्वारे त्यांना युरोपमधील सर्वोत्कृष्ट नक्कल करणारा आणि जगभरात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.