
फोनच्या नादात कारला धडकली स्कुटर, तोंडासहित कारचा झाला चुराडा अन्... थरकाप उडवणारा Video Viral
भारतीय रस्त्यावरील बहुतांश वाहनचालक दंड टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करतात. जिथे त्यांना कॅमेरे किंवा वाहतूक पोलीस दिसत नाहीत तिथे ते बिनदिक्कतपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या 10 वर्षांत (2014-2023) सुमारे 15.3 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. अपघातांचा हा आकडा वाढत असला तरी लोक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि अपघाताला बळी पडतात.
यामुळेच रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. रस्ते अपघातांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की लोक वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करतात, ज्यात दबंगिरी, स्टंटबाजी यांचा समावेश आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकी चालवताना गाडी चालवण्यापेक्षा मोबाईलवर जास्त फोकस करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, त्यामुळे समोरून येणाऱ्या कारवर त्याचे लक्ष जात नाही आणि पुढच्याच क्षणी त्याच्या स्कुटरची कारला जोरदार धडक बसते. ही धडक इतकी भयानक असते की यात कारचा चुराडा तर होतोच शिवाय व्यक्तीचे तोंड देखील जोरदार आपटले जाते.
हेदेखील वाचा – शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवलं! पिसाळलेल्या बैलाने भरबाजारात व्यक्तीवर केला हल्ला, थरारक Video Viral
हा व्हिडीओ 46 सेकंदांचा आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कारमधून आरामात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर रस्त्यात एक वळण लागते. त्या माणसाने गाडी वळवताच समोरून एक स्कूटरस्वार त्याच्या दिशेने येऊ लागते. हे पाहून तो ओरडतो – ओय… आणि गाडीचा वेग कमी करतो. दरम्यान, स्कूटर चालकाचे संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असल्याकारणाने समोरून येत असलेल्या कारकडे त्याचे लक्ष जात नाही आणि कारच्या बोनेटला तो जोरदार धडकतो. ही धडक इतकी जोरदार असते की यात व्यक्तीच्या चेहऱ्याचा संपूर्ण नकाशाच बदलतो. व्हिडिओतील थरकाप उडवणारी दृश्ये पाहून आता युजर्स अचंबित झाले आहेत.
Distracted Driving is dangerous. Always have a dashcam. The game will end anytime,don’t play Russian Roulette on the road. #IndianRoads pic.twitter.com/59bU7Rly9O — DriveSmart🛡️ (@DriveSmart_IN) November 13, 2024
हेदेखील वाचा – किंग कोब्रासोबत रोमान्स करू लागली महिला, जीभ बाहेर काढत घेतली किस, मग कोब्राने जे केलं… धक्कादायक Video Viral
अपघाताचा हा व्हायरल व्हिडिओ @DriveSmart_IN नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘वाहन चालवताना विचलित होणे धोकादायक आहे. नेहमी डॅशकॅम ठेवा. एक छोटीशी चूक आयुष्य संपवू शकते. त्यामुळे रस्त्यावरच्या जीवनाशी खेळ करू नका’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील थरार पाहून यावर अनेक युजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अपडेटनुसार, दुचाकीस्वार सुरक्षित आहे पण मांडीचे हाड तुटले आहे आणि तो फ्रॅक्चर झाला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खात्री नाही पण बहुधा कारने हॉर्न वाजवल्याने दुचाकीस्वाराला सावध केले असते आणि फरक पडला असता. दुर्दैवाने, कोणत्याही दोषाशिवाय कारचालकही यात अडकला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.