Viral Video Women Crossing Railway Track While Train Coming Shocking Video Goes Viral
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. अलीकडे डान्स, स्टंट, जुगाड यांशिवाय अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तुम्ही अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे घडलेले असतात. प्रशासनाने वारंवार अनेक सुचना देऊनही लोक सिग्नलस रेल्वे क्रॉसिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा नियम न पाळता क्रॉसिंग करतात अन् अनर्थ होऊन बसतो.
नेमकं काय घडलं?
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने रेल्वे क्रॉसिंग बंद असताना देखील ट्रॅ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या महिलेसोबत असे काही घडले आहे की, ती पुन्हा असा करण्याचा विचार देखील करणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे ट्रॅकचा परिसर दिसत आहे. स्टेशनपासून काही अंतरावरुन एक ट्रेन येताना दिसत असून. याच वेळी काही लोक ट्रेन येत असूनही ट्रॅकवरुन ये-जा करत आहेत. याचवेळी एक महिला देखील ट्रेन अगदी जवळ असताना क्रॉसिंग करत. ती जोरात पळत सुटते. पण, थोड्या क्षमाचा विलंब झाला असता तर यामुळे तिचा अपघात झाला असता. तिला गंभीर दुकापत झाली असती किंवा जीवाला मुकली असती.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून इन्स्टाग्रामवर @arup.bhattacharjee.731 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला असून एका युजरने म्हटले आहे की, पागल आहे का बाई, तर दुसऱ्या एकाने काय चाललंय हे, लोकांना जीवाचा पर्वाच नाहीय. अनेकांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर दिल्या आहे. हा व्हिडिओ कदीचा आणि कुठला आहे याबात कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून लक्षात घेण्यासारखे आहे की, आपला निष्काळजीपणा आपल्या जीवाचे बरे वाईट करु शकतो, यामुळे आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते. नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.