प्रेमासाठी कायपण! प्रेयसीची नाराजी दूर करण्यासाठी पठ्ठ्याने असं काही केलं; पाहून पोट धरुन हसाल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी का पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा मजेशीर, चित्र-विचित्र असे ट्रेंड पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यासांरखे व्हिडिओ सतत व्हायरल होत असताता. याशिवाय, अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. तसेच प्रेमात पडलेले तरुण तरुणी देखील आपल्या आयुष्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एका प्रेमीयुगलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नोएडामधील असून या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भन्नाट अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
तुम्ही पाहिले असेल, अनेकदा प्रेमी-प्रेयसी नाराज झाल्यावर एकमेकांना खुश करण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी काही ना काही खास गिफ्ट देतात किंवा माफी मागतात. तसं तर अलीकडे सोशल मीडियावर सुरु झालेले प्रेम आणि त्यातील भांडणे ही सोशल मीडियावर सोडवली जातात, ती ही अशा भन्नाट पद्धतीने की पाहून हसू हसून पोट दुखून येईल. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. आपल्या प्रेयसीची नाराजी दूर करण्यासाठी या पठ्ठ्याने नेमकं काय केले आहे ते पाहूयात.
तर या तरुणाने प्रेयसीची नाराजी दूर करण्यासाठी रस्त्यांवर, भींतींवर, खांबांवर “सॉरी बुबू” असं लिहिलेले पोस्टर चिटकवलेले आहेत. या एका अज्ञात तरुणाचे नाव माहित नाही पण त्याने हे पोस्टर सर्वत्र चिकटवलेले व्हिडिओत दिसत आहे. या पोस्टने आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. फक्त “सॉरी बुबू” आणि दोन-तीन इमोजी असं साधं वाक्य असं लिहिलेले असून हे लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना कारणीभूत ठरले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नोएडा से मेरठ तक ‘SORRY BABU’ के पोस्टर वायरल!
▪️ नोएडा सेक्टर-37 बोटेनिकल FOB पर भी दिखे पोस्टर
▪️ सोशल मीडिया पर तेजी से हो रही चर्चा
▪️ पुलिस ने लिया संज्ञान, पोस्टर लगाने वाले की तलाश जारी
▪️ CCTV फुटेज से हो रही पहचान pic.twitter.com/C5tHIFwgRE— Greater Noida West (@GreaterNoidaW) January 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GreaterNoidaW या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोहून अधिक लोकांना पाहिले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने “बाबू” शब्द चुकीच्या पद्धतीनं लिहिला आहे का असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने नाही त्या बाबू नाही बुबू चं म्हणायचे होते असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याची इमोजी शेअर करत अशाच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या व्हिडिओने बाबू की बुबू अशा चर्चेला उधाण आणले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.