Viral video young man riding four bicycle at once video goes viral
सोशल मीडिया हे अलीकड मनोरंजानाचे एक मोठे माध्यम बनत चालले आहे. सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ दर सेकंदाला आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्स, जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होतात. स्टंटचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. यामध्ये एक तरुण एकसाथ चार सायकल चालवत आहे.
खरं तरं दोन वेळेच्या अन्नानसाठी पोटासाठी दोरीवर स्टंट करुन दाखवणाऱ्यांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये एका मोकळ्या मेदानावर अनेक लोकांची गर्दी जमलेली असून चार व्यक्ती तिथे स्टंट करुन दाखवत आहेत. याच वेळी एक एक व्यक्ती सायकलींचा तोल सांमभालत स्टंट करत आहे. तो पहिल्यादा एक सायकल चालवायला घेतो, त्यांनतर एका वेळी दोन, परत तीन आणि नंतर एक सायकल डोक्यावर आणि तीन सायकल एका वेळी चालवत असतो. हा स्टंट दिसताना अगदी अद्भुत दिसत आहे. हे पाहणारे जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देत आहेत. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @out_offun या पेजवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नादच खुळा भाऊ तुझा तर काही युजर्सनी आश्चर्यचकित झाल्याचा इमोजी शेअर केला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहून काहींनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.