हे काय घडलं? वधूची मांग भरल्यानंतर वराने 'असं' काही केलं की...; VIDEO पाहून बसेल धक्का (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून रडावे की हसावे कळत नाही. डान्स, स्टंट, जुगाड यासांरखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. याशिवाय लग्नातील वेगवेगळ्या विधींचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे लग्नातील व्हिडिओ असे असतात की आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक होश उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एक लग्नमंडपात वर-वधूच्या लग्नाचा अंतिम विधी सुरु असल्याचे दिसत आहे. पंडितजी विधी मंत्र म्हणत आहेत. याचवेळी वराला वधूची मांग भरायला सांगतात. पण वर असे काही करतो की, पाहून मंडपातील लोकांनाही धक्काबसला आहे. तुम्ही पाहू शकता की, वर आपल्या वधूच्या मांगमध्ये सिंदूर लावतो, पण यानंतर तो मंडपात मागे बसलेल्या इतर 6 मुलींच्या मांगमध्ये देखील एक-एक करून सिंदूर लावू लागतो. हे पाहून सर्वांना धक्का बसतो. सध्या हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष बेधून घेत आहे. वराच्या कृत्यानंतर मंडपातील वातावरण काही काळासाठी विस्कळीत होते आणि सर्वांनाच धक्का बसलेला असतो. वधूला देखील असे वराचे हे वागणे अजिबात आवडत नाही. ती वराकडे रागाने पाहू लागते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @actor_nanhe या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘नवरीसोबत मेहुणी फ्री असे लिहिलेले आहे(दुल्हन के साथ साली फ्री). हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहूनअनेकांनी वराने असे का केले असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने भावाची मजा आहे बाबा असे म्हटले आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या कमेंट्सवरून हे स्पष्ट होते की लग्नादरम्यान अशा अनोख्या घटना लोकांसाठी एक विचित्र अनुभव असतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.