Viral Video: तिचा तो विचित्र डान्स पाहून म्हैस ही वैतागली; जोरात धक्का दिला अन्... (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे उत्तम साधन बनलेले आहे. आपल्याला सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कधी डान्स, तर कधी स्टंट, भांडण जुगाड यासांरखे वेगवेगळ्या कंन्टेटचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा काही व्हिडिओ असे असतात की पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणे अक्षरश: कठीण जाईल.
यामध्ये म्हशीसमोर डान्स करणाऱ्या तरुणीसोबत असे काही घडलं आहे, याचा तिनं विचार देखील केला नसेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गोठ्याचा परिसर दिसत आहे. तिथेच एक गाय आणि म्हैस चारा चरताना दिसत आहेत. याच वेळी एक तरुणी एका म्हशीला चारा खायला टाकते. त्यानंतर ती अचानक असे काहीतरी करते की, म्हैस देखील वैतागते. ही तरुणी अचानक विचित्र हातावारे करत डान्स करायला लागते. हे पाहून ती म्हैस तिला आपल्या शिंगांनी जोरात धक्का देते. यामुळे तरुणी जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत जाऊन पडते. तिला उठणही कठीण होते इतक्या जोरात म्हशीने धक्का दिलेला असतो. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर हशा पिकला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या मनोरंजनाचे कार्य करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वी देखील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तिला उत्तर मिळालेच असे, भैस के आगे बिन बजानेसे कुछ नहीं होता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने, म्हैसही म्हटली असे बाईईईईईईईईई हा काय प्रकार? अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने अती तिथं माती असे प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.