
आगीला हातात खेळवत स्वतःच्याच शरीराला लावली आग, जादुई दृश्ये अन् थरकाप उडवणारा Video Viral
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दररोज त्यांच्या युजर्सना आश्चर्यचकित करत आहेत कारण दररोज सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जे लोकांना थक्क करतात. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओज पाहिले असतील. यात कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यांना पाहून आपण अचंबित होतो. लोक या व्हायरल व्हिडिओजची फार मजा लुटतात. हेच कारण आहे की लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे नवीन पण थरकाप उडवणारे दृश्य दिसून येत आहे.
तुम्ही जादू हा प्रकार बऱ्याचदा प्रत्यक्षात अथवा मोबाईलमध्ये पाहिला असावा. जादू ही एकमेव अशी गोष्ट आहे जिला पाहताच आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. यात अशा काही काल्पनिक गोष्टी सत्यात घडवलेल्या दाखवल्या जातात ज्यांना पाहताच लोक थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक थक्क करणारी जादू फार व्हायरल होत आहे. ही जादू पाहून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. यात एक तरुणी एका जळत्या स्टिकने चक्क आपल्या शरीराला आग लावताना दिसून येत आहे. एवढेच काय तर ती या जळत्या आगीला आपल्या नियंत्रणात करतानाही दिसून येत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी टेबलावर बसलेली दिसत आहे आणि तिच्या दोन्ही हातात दोन स्टीक आहेत. एकात आग जळत आहे. सर्व प्रथम मुलगी ती काठी तिच्या पायाच्या बोटात आणते आणि नंतर ती आपल्या हातांनी छातीकडे, नंतर दुसऱ्या हाताकडे आणि नंतर दुसऱ्या काठीकडे जाते. जणू कोणी व्हॉलीबॉल खेळत आहे. यानंतर ती मुलगी ती काठी तोंडात देखील टाकते आणि मग तोंडातून आग काढून दुसऱ्या काठीला आग लावते. यानंतर मोठ्या सराईतपणे आगीला तिच्या ट्रेकने वीजवत त हा शो संपवते. व्हिडिओतील दृश्ये इतकी मजेदार आहेत की पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
Fireplay Friday pic.twitter.com/ekyLtfp3MA — Kane’s Street Smarts (@FrankKane11) November 8, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @FrankKane11 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘फॉरप्ले फ्रायडे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तरुणीच्या या जादूवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे प्रभावशाली आहे, ती खरोखरच पेटली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे आश्चर्यकारक आणि भितीदायक आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्टेज तुझा आहे… लाईट, कॅमेरा, ॲक्शन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.