अचानक आपल्यासमोर साप (snake) किंवा अजगर (python) आला की भितीने थरकाप उडतो. पण हाच साप किंवा अजगर अचानक घराच छत तोडून आपल्यासमोर येऊन पडला तर काय होईल याचा विचार न केेलेला बरा. एखद्या हॅालिवूड सिनेमामध्ये दाखवतात तसा प्रंसग घडलाय मलेशियात. रात्री जेवणानंतर संपूर्ण कुटुंब आरामात टिव्ही पाहत आहे आणि त्यानंतर अचानक छत तुटले आणि एक महाकाय अजगर त्यांच्यावर पडला. या घटनेनं सर्वांची घाबरगुंडी उडाली. पहा नेमकं काय झालं.
[read_also content=”पाकिस्तानाची दैना पाहवेना, चिकनच्या दरात १७३ रुपयांनी वाढ! एक लिटर दूध 150 रुपयाला, कांद्याचे भावही भिडले गगनाला https://www.navarashtra.com/latest-news/daily-food-item-milk-chicken-onion-become-expensive-in-pakistan-nrps-360912.html”]
रात्रीचे सुमारे अकराचे वाजले होते. रात्री जेवण झाल्यावर एक कुटुंब घरात आरामात टीव्ही पाहत होते. त्यानंतर अचानक छत तुटले आणि एक महाकाय अजगर त्यांच्यावर पडला. सापाला पाहताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या कुटुंबाने याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, मलेशियातील मिरी, सारवाक येथे रात्री एका कुटुंबासोबत ही घटना घडली. संपूर्ण कुटुंब रात्री टीव्ही पाहत असताना अचानक घराचे छत तुटले आणि 10 फूट लांब अजगर त्यांच्यावर पडला. समोर अजगर पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर मिरी पब्लिक डिफेन्स फोर्सचे ४ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे त्याला एका पेटीखाली लपलेला सुमारे 8 किलो वजनाचा आणि 10 फूट लांबीचा अजगर आढळला. त्यानंतर पथकाने या अजगराची सुटका करून जंगलात सोडले.
या घटनेबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या घरात अजगर पकडला गेला त्या घरात चार लोक राहतात. घरातील एका 32 वर्षीय महिलेने माहिती दिली की, एक साप छतावरून पडला होता आणि घरातच एका बॉक्सखाली लपला होता. प्रकरण गेल्या ८ ऑक्टोबरचे आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.