International News
चीनच्या एका न्यायालयाने एकाच कुटुंबातील ११ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण कुटुंब एक गुन्हेगारी टोळी चालवत होते, खून ते फसवणूक, वेश्याव्यवसाय आणि मनी लाँड्रिंग अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये या कुटुंबाचा सहभागा होता. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे संगतमताने गुन्हेगारी कारवाया केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, वेन्झोउ इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने म्यानमारमधील कोकांगमधील एका प्रभावशाली कुटुंबातील मिंग गुओपिंग, मिंग झेनझेन आणि झोउ वेइचांग यांच्यासह आठ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायालयाने इतर पाच जणांना दोन वर्षांची आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर इतर १२ जणांना पाच ते २४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
वृत्तानुसार, या व्यक्तींवरचे गुन्हे इतके गंभीर आहेत की त्यांच्या या गुन्ह्यांची यादी वाचली तर कुणाच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. . त्यांच्या विरुद्ध 1.4 अब्ज डॉलरहून अधिक किमतीचा बेकायदेशीर जुगार व फसवणूक रॅकेट चालवण्याचा, अनेक कर्मचाऱ्यांची हत्या करण्याचा आणि वेश्याव्यवसायात सहभाग असल्याचा आरोप आहे. संपूर्ण कुटुंबाला स्थानिक पातळीवर “मिंग कुटुंब” म्हणून ओळखले जाते.
चीनच्या राज्य प्रसारक सीसीटीव्हीच्या अहवालानुसार, मिंग कुटुंबाने 2015 पासून पूर्व चीनमधील झेजियांग प्रांतात विस्तृत गुन्हेगारी नेटवर्क चालवले आहे. या कुटुंबाच्या टोळीने म्यानमारच्या कोकांग प्रदेशातील प्रभावाचा वापर करून विविध भागात असंख्य बेकायदेशीर अड्डे उभारले आणि त्यातून आपली गुन्हेगारी कारवाया राबविल्या, असे आरोप करण्यात आले आहेत.
मिंग कुटुंबाने टेलिकॉम फसवणूक, बेकायदेशीर कॅसिनो, ड्रग्ज तस्करी, तस्करी आणि वेश्याव्यवसाय यासह विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला. या बेकायदेशीर कारवायांमधून त्यांनी अंदाजे १० अब्ज युआन (सुमारे १२,००० कोटी रुपये) कमावले.
युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार
अहवालानुसार, चीन आणि आसपासच्या भागात जुगार हा गुन्हा मानला जातो. याचा फायदा घेत, मिंग कुटुंबाने सीमेपलीकडे अनेक कॅसिनो उघडले, मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि तस्करीसाठी मोठी नेटवर्क तयार केली. त्यांच्या सर्वात गंभीर गुन्ह्यात लोकांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात असे, आणि जो कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करत असे त्याला मारले जात असे.
गुन्ह्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर, प्रकरण न्यायालयात पोहोचले. तपासात असे आढळले की परदेशातून लोकांना या तळांवर काम करण्यासाठी आमिष दाखवले जात असे. बहुतेक कामगार चिनी नागरिक होते. जेव्हा हे बेकायदेशीर कृत्य उघडकीस आले, तेव्हा पळून जाणाऱ्यांना छळले जात असे आणि बोलण्यास नकार दिल्यास त्यांना मारले जात असे.
दोन वर्षांपूर्वी, बंडखोर गटांनी लुकाई परिसरातील तळांवर हल्ला केला, जेथे मिंग कुटुंबाचे सदस्य होते. या हल्ल्यात मिंग कुटुंबाचा प्रमुख मारला गेला. त्यानंतर, चिनी पोलिसांनी अनेक सदस्यांना अटक केली. फेब्रुवारीमध्ये झेजियांग न्यायालयाने प्रथमच कुटुंबाच्या गुन्ह्यांची सुनावणी केली, ज्यात फसव्या गुंतवणूक योजना, फिशिंग घोटाळे आणि खंडणी यासारख्या गुन्हेगारी कारवायांचे जाळे उघडकीस आले.