दक्षिण कोरिया: जगभरात हॅलोविन उत्सव उत्साहात साजरा होत असताना दक्षिण कोरियातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण कोरियातील सोल येथे हॅलोविन कार्यक्रमा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर झाली. या दुर्दुेवी घटनेत तब्बत 151 लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
[read_also content=”राजरंग : दिवाळी मनोमिलन आणि फटाके https://www.navarashtra.com/blogs/political-diwali-celebrations-and-fireworks-nrvb-340097.html”]
द कोरिया हेराल्डच्या वृत्तानुसार, सुमारे 1 लाख लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे सर्व लोक शनिवारी रात्री हॅलोविन साजरा करण्यासाठी मेगासिटीच्या मध्यवर्ती जिल्ह्यातील इटावानमध्ये जमले होते. त्याच वेळी, स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीच्या आधी हॉटेलजवळ काही लोक बेशुद्ध झाले. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री अनेक लोकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याबद्दल तक्रारी केल्याचं सांगितलं.