कीव- रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा २० वा दिवस आहे. युक्रेनसोबत एककीडे शांततेसाठी चर्चा सुरु असतानाच, दुसरीकडे रशियाकडून सासत्याने युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत. सोमरवारी रशियाचे समर्थन करणारे विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या डोनेट्स्क शहरावर बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आले. त्यात २० सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला युक्रेनी सैन्याने केल्याचा आरोप रशियाने केला आहे. मात्र याबाबतचे कोणतेही पुरावे रशिया देऊ शकलेला नाही.
दरम्यान हल्ला केल्याचा आरोपाचा युक्रेनने नकार दिला आहे. रशियाच्या मिसाईलचा नेम चुकल्याने हा हल्ला झाल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. आता प रशिया युक्रेनवर आरोप करीत कांगावा करीतल असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कोर्टात रशियाच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या युक्रेनच्या याचिकेवर १६ मार्च म्हणजेच बुधवारी निर्णय सुनावण्यात येणार आहे. ७ मार्चला झालेल्या या पूर्वीच्या सुनावणीत रशियाने युक्रेनमधील सैन्य कारावाया थांबवण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नरसंहाराच्या व्याख्येचा चुकीचा अर्थ लावत, रशियाने हल्ला केल्याचाही युक्रेनचा दावा आहे. रशियाने या सुनावणीला विरोध करत, झालेल्या सुनावणीवर बहिष्कार घातलेला आहे.
झेलेंस्की अमेरिकेतील संसदेशी साधणार संवाद
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की व्हिडिओ कॉम्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेच्या खासदारांशी संवाद साधणार आहेत. संसदेचे सभापती नैन्सी पेलोसी यांनी सिनेटमध्ये ही घोषणा केली आहे. या संवादामुळे युक्रेनच्या मदतीसाठी फायटर जेट्स वाढवण्यासाठी जो बायडेन यांच्यावर दबाव वाढेल, असी शक्यताही वर्तवण्यात येते आहे. दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेच्या खासदारांशी बोलताना झेलेंस्की यांनी फायटर जेट्स पाठवण्याची मागणी केली होती.
[read_also content=”तुमची राशी कोणती? पाण्यासारखा पैसा खर्च करतात ‘या’ राशीचे लोक https://www.navarashtra.com/horoscope/horoscope/what-is-your-zodiac-sign-people-of-this-zodiac-sign-spend-money-like-water-nrvk-255045.html”]
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेली शांततेसाठीची चर्चा सोमवारी अपूर्ण राहिली. दोन्हीही पक्ष एका तोडग्यावर अद्याप येवू शकलेले नाहीत. आता मंगळवारीही ही चर्चा होणार होणार आहे.