Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kazakhstan Plane Crash : कझाकीस्तानमध्ये विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू ; भयावह Video आला समोर

Azerbaijan Airlines Plane Crash : कझाकीस्तानमध्ये आज भीषण विमान दुर्घटना घडली. यात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 25, 2024 | 04:55 PM
Kazakhstan Plane Crash

Kazakhstan Plane Crash

Follow Us
Close
Follow Us:

कझाकीस्तानमध्ये आज भीषण विमान दुर्घटना घडली. यात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अकाटू शहरानजीक ही दुर्घटना घडली. त्याचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत विमान कोसळल्यानंतर स्फोट झाला आहे. कझाकीस्तान सरकारच्या हवाल्याने AP ने हे वृत्त दिलं आहे.

Another angle of the plane crash in Aktau, Kazakhstan pic.twitter.com/x7ECIcmxgZ

— RT (@RT_com) December 25, 2024

BNO News has shared another, extremely horrific video of the Azerbaijan Airlines Flight 8243 crash in Kazakhstan’s Aktau.#Kazakhstan #Aktau #PlaneCrash #Azerbaijan https://t.co/6fvK0FkuFy pic.twitter.com/cep56WaGYU

— Vani Mehrotra (@vani_mehrotra) December 25, 2024

कझाकिस्तानच्या अकाटू येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान क्रॅश झालं. स्फोटाचा व्हिडीओही समोर आला आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र त्यानंतर लगेचच हे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अजरबाईजन एअरलाईनचं हे विमान होतं.

नेमकं काय घडलं?

अजरबाईजन एअर लाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, J2-8243 या विमानाचं बाकू पासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने या विमानाचं लँडिंग करावं लागलं. अकाटूपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. TASS या रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी ५२ फायरफायटर्स आणि ११ बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत ज्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण भरलं होतं. ग्रोज्नीमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे विमानाने आपला मार्ग बदलला. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ असताना त्याचा व्हिडिओ शूट करत करण्यात आला. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना हे विमान दिसत आहे. धावपट्टीवर येण्यापूर्वीच हे विमान जमिनीवर आदळलं त्यावेळी मोठा आवाज झाला. विमानातील प्रवासीही किंचाळत असल्याचा आवाजही व्हायरल व्हिडीओत येत आहे. विमान कोसळल्यावर त्याला आग लागली. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर या अपघाताचे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.

काही वृत्तसंस्थांनी विमानाचा अपघात हा दाट धुक्यांमुळे झाला आहे आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळल्याचं म्हटलं आहे.  तर काही वृत्तसंस्थांनी विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असं म्हटलं आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Web Title: 42 people dead in kazakhstan plane crash azerbaijan airlines plane crash kazakhstan emergency ministry report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 03:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.