8 attacks in just 1 hour BLA behind military camp operation 18 soldiers suffered casualties
Pakistan’s Baloch Insurgency : बलुचिस्तानमधील असंतोषाने आता ज्वालामुखीचे रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्करावर सातत्याने होणारे हल्ले आता अधिक नियोजित आणि तीव्र होत चालले आहेत. विशेषतः गेल्या ३६ तासांत बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने ‘ऑपरेशन बाम’ अंतर्गत एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये समन्वितपणे हल्ले चढवले. एका तासाच्या कालावधीत तब्बल ८ ठिकाणी लष्करी छावण्यांवर धडक कारवाया करण्यात आल्या. या हल्ल्यांमध्ये सुमारे १८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
बलुचिस्तानमधील सर्व ३७ जिल्ह्यांमध्ये बंडखोरीचा भडका उडालेला दिसत आहे. BLA आणि इतर बलुच बंडखोर संघटनांनी आता थेट पाकिस्तानी लष्करालाच लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे, हे हल्ले केवळ शस्त्रसज्ज नव्हते, तर अत्यंत समन्वित आणि ठोस माहितीवर आधारित होते. हे दाखवून देतं की बंडखोरांचा खुफिया आणि संघटनात्मक पाया आता अधिक मजबूत झाला आहे.
BLAने हल्ल्यांसाठी ‘ऑपरेशन बाम’ नावाचे विशेष अभियान सुरु केलं आहे. या अंतर्गत, पाकिस्तान सरकारच्या ताब्यातील सुरक्षा छावण्यांवर तसेच CPEC अंतर्गत सुरु असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्पांवर हल्ले केले जात आहेत. सर्ब भागातील फ्रंटियर कॉर्प्सच्या छावणीवर हल्ला करत बंडखोरांनी काही वेळासाठी ती पूर्णपणे ताब्यात घेतली होती. BLAने या कारवाईची जबाबदारी स्वीकारून म्हटलं की, “हे केवळ सुरुवात आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर नवा टॅरिफ बॉम्ब! 22 देशांना पत्र, भारतासाठीही धोका?
८ हल्ल्यांमध्ये सर्वात गंभीर कारवाई झाओ (डोलेजी), क्वेटा (किराणी रोड), आणि सर्ब जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. झाओमध्ये झालेल्या कारवाईत ३० मिनिटे जोरदार चकमक झाली, जिथे लष्करी छावणीवर थेट गोळीबार करण्यात आला. क्वेटाच्या हजारा टाऊनजवळ सुरक्षा चौकीवर हल्ला करण्यात आला. याशिवाय, अनेक ठिकाणी नाकाबंदी करून लष्करी वाहने अडवण्यात आली आणि CPECशी संबंधित मालवाहतूक थांबवण्यात आली.
या वाढत्या हल्ल्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला धक्का बसला आहे. अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले जात असले तरी देशांतर्गत अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय दबाव हे दोन्ही वाढले आहेत. चीनचाही या हल्ल्यांमुळे CPEC प्रकल्पांबाबत नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बिलावल भुट्टोंचा मोठा गौप्यस्फोट! पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर
बलुचिस्तानमधील बंडखोरी ही केवळ लष्करी कारवायांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही चळवळ आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर विस्तारत असून, बलुच लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना अधिक ठाम होत चालली आहे.