Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर नवा टॅरिफ बॉम्ब! २२ देशांना पत्र, भारतासाठीही धोका? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump new Tariff policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार व्यवस्थेला हादरवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी २२ देशांवर नव्या आयात शुल्कांची (टॅरिफ) घातलीय भलीमोठी यादी जाहीर केली असून, प्रत्येक देशाला यासंदर्भात अधिकृत पत्रही पाठवले आहे. या नव्या टॅरिफ धोरणांची अंमलबजावणी येत्या १ ऑगस्ट २०२५पासून केली जाणार आहे.
या नव्या कर प्रणालीमध्ये फिलीपिन्स, श्रीलंका, ब्राझील, लिबिया, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान, बांगलादेश यांसारख्या देशांचा समावेश आहे. काही देशांवर २०% पासून थेट ५०% पर्यंत शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी स्टील, अॅल्युमिनियम आणि तांब्यावरही ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किमतींमध्ये मोठा उतार पाहायला मिळत आहे.
देशाचे नाव | कर दर (%) |
---|---|
ब्राझील | ५०% |
म्यानमार, लाओस | ४०% |
कंबोडिया, थायलंड | ३६% |
बांगलादेश, सर्बिया | ३५% |
इंडोनेशिया | ३२% |
श्रीलंका, लिबिया, इराक, अल्जेरिया | ३०% |
दक्षिण आफ्रिका, बोस्निया | ३०% |
जपान, ब्रुनेई, कझाकस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया | २५% |
फिलीपिन्स | २०% |
सर्वांच्या नजरा सध्या भारत आणि चीनवर केंद्रित आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनाने यावर अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. पूर्वी चीनवर कठोर टॅरिफ लादल्यानंतर जगभरात व्यापार युद्धाचे वादळ उठले होते. त्यामुळे यावेळी ट्रम्प प्रशासन जास्त सावधगिरीने आणि टप्प्याटप्प्याने निर्णय घेत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक
अमेरिकेने यावेळी केवळ धातूंवरच नव्हे, तर औषधनिर्मिती उत्पादनांवरही कर लावले आहेत. ट्रम्प यांचा उद्देश स्पष्ट आहे देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, आणि परकीय आयातीवरील अवलंबन कमी करणे. विशेषत: तांब्यावरील ५० टक्के करामुळे, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम व ऊर्जा क्षेत्रात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका आता परदेशातून तांबे आयात करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बिलावल भुट्टोंचा मोठा गौप्यस्फोट! पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर
भारत अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारांसोबत व्यापार करतो. जर अमेरिकेने भारतावरही टॅरिफ लादले, तर त्याचा थेट परिणाम भारतीय निर्यातदार, स्टार्टअप्स, फार्मा कंपन्या व आयटी सेवा यांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे भारताकडूनही लवकरच यावर स्पष्ट भूमिका येण्याची शक्यता आहे.