A Malaysian police helicopter crashed directly into a river, the crew members were successfully rescued.
क्वालालंपूर : एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेलेशियाच्या जोहोर राज्यात पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा नदीत कोसळून भीषण अपघात झाला. आपत्कालीन लॅंडिग दरम्यान हा अपघात घडला. सुदैवाने विमानातील अधिकाऱ्यांना आणि क्रू मेंबर्सना वेळेत बाहेर काढण्यात आले, यामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहे.
मलेशियाच्या सुंगई पुलई परिसरात पोलिस हेलिकॉप्टरचा नियमित लष्करी सराव सुरु होता. या हेलिकॉप्टरमध्ये पाच क्रू मेंबर्ससह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सर्वांना वाचवण्यात यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सध्या या अपघाताची चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा तपास ब्युरोकडून केला जाईल असे मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले.
मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने या घटनेची माहिती दिली. मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (९ जुलै) रोजी ही घटना घडली. बुधवारी सकाळी ९.५१ वाजता तनजुंग कुपांग पोलिस स्टेशन येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. उड्डाणनंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लॅंडिग करावे लागले.
यामुळे आपत्कालीन लॅंडिग सुंगई पुलई परिसरातील नदी पात्रात करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये पाच पोलिस फोर्स अधिकाऱ्यांचा समावेश होता. सध्या मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सध्या या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये विमान नदी पात्रात जोरदार कोसळताना दिसत आहे.
WATCH: Police helicopter crashes into Pulai River in Johor, Malaysia, at least 5 people hospitalized. pic.twitter.com/3456sNg5xT — AZ Intel (@AZ_Intel_) July 10, 2025
हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर फ्रेंच बनावटीचे एअरबस AD355N मॉडेलचे होते. हलक्या युटिलीटी सिंगल-रोटरचे हे हेलिकॉप्टर होते. १९७५ ते २०१६ या काळात याची निर्मिती करण्यात आली. हे हेलिकॉप्टर जगभरातीलसुरक्षा दल, खाजगी चार्टर आणि कॉर्पोरेट सेवांसाठी वापरले जाते. १९९६ मध्ये हे हेलिकॉप्टर मलेशियाला देण्यात आल होते. सध्या या अपघातामुळे ३० वर्षे जुन्या एअरबेस AD355N विमानांचे आयुष्य संपले आहे.