धक्कादायक! अफगाणिस्तानात सहा वर्षांच्या चिमुकलीचे लग्न ; वराचे वय जाणून बसेल झटका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल : एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुकलीचे ४५ वर्षाच्या अफगाण पुरुषाशी लग्न करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेवर संपूर्ण जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकास्थित अफगाण मीडिया आउटलेट Amu.tv ने हे वृत्त दिले आहे.
यानंतर तालिबान सरकारमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर कारवाई म्हणून संबंधित मुलीच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच वरालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने मुलीला वयाच्या ९ व्या वर्षी तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या हेलमड प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चिमुकीचे लग्न लावून देण्यात आलेल्या पुरुषाला आधीच दोन बायका आहेत. परंतु तरीही चिमुकलीच्या कुटुंबाने तिचे लग्न लावून दिले. या बदल्यात चिमुकलीच्या कुटुंबाला पैसे देऊ करण्यात आले आहे. यामुळे तालिबान सरकारने मुलीच्या आई-वडिलांना आणि वराला अटक केली आहे. परंतु कोणावरही आरोपत्र दाखल करण्यात आलेले नाही.
२०२१ मध्ये तालिबान सरकार सत्तेत आले. तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाच्या, तसेच जबरदस्तीने चिमुकल्या मुलींचे लग्न लावून देण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय तालिबान सरकारने महिलांवर अनेक निर्बंध देखील लादले आहे. यामुळे हे प्रमाण अधिक वाढत आहे. तालिबान सरकारने दावा केला आहे की, या घटना थांबवण्यासाठी त्यांचे सरकार प्रयत्न करत आहेत.
परंतु संयुक्त राष्ट्रांच्या महिला अहवालानुसार, तालिबान सरकारच्या महिलांविरोधी कायद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये बालविवाहत २५% वाढ झाली आहे. तसेच किशोयवयीन गर्भधारणेत ४५% ने वाढ झाली आहे.
परंतु अद्यापही अफगाणिस्तानच्या काही दुर्गम भागांमध्ये मुलींची यौनीसाठी विक्री केली जात आहे. या बदल्यात कुटुंबाला भक्कड पैसा दिला जात आहे. मुलींना त्यांच्या दिसण्यावरुन, आरोग्यावरुन आणि शिक्षणावरुन त्याची किंमत मोजली जात आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. यामुळे गरीब लोकांना पैशाचे अमीष दाखवून त्यांच्या मुली विकण्यास भाग पाडले जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये मुलींचा बालविवाह एक परंपरेचा भाग मानला जातो. यामुळे या लहान मुलींची कमी वयातच नातेवाईकाशी लग्न लावून दिले जातात. अफगाणिस्तानमध्ये महिंलांकडे कुटुंबाची मालमत्ता म्हणून पाहिले जाते.