UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबू धाबी : काही दिवसांपासून यूएईच्या गोल्डन व्हिसाबाबत सोशल मीडियावर एक अफावा जोर धरत होती. सोशल मीडियावर दावा केला जात होता की, काही निवडक राष्ट्रांतील नागरिकांन लाईफटाईम गोल्डन व्हिसा यूएईकडून दिला जाणार आहे. परंतु संयुक्त अरब अमिरातीने (UAE)ने लाईफटाईम गोल्डन व्हिसाच्या अफवांचे खंडन केले आहे. लाईफटाईम गोल्डन व्हिसा केवळ भारतीयांसाठी किंवा निवडक देशांसाठी नसल्याचे युएईच्या नागरिकता, सीमाशुल्क आणि बंदर सुरक्षा प्राधिकरणाने (IPC) सांगितले आहे.
यूएईच्या अधिकृत वृत्तसंस्थेना WAM ने दिलेल्या वृत्तानुसार, फेटर अथॉरिटी फॉर आयडेटिंटी, सिटीझनशिप कस्टम्स अँड पोर्ट सिक्युरिटी (ICP)ने या अफवा खोट्या असल्याचे सांगतिले आहे. ICP ने सांगितले आहे की, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे आणि वेबसाइट्सद्वारे यांसदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे. या सर्व अफवा खोट्या असून लोकंनी सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवून नये असे ICP ने म्हटले आहे.
ICP असेही स्पष्ट केले आहे की, गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्व अटी, श्रेणी व यूएईच्या नियम कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच यूएईच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयांनुसार सर्व नियम ठरवण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला किंवा विशिष्ट राष्ट्रीयतेला फक्त पैसे भरुन व्हिसा प्राप्त होणार नाही. यासाठी व्हिसाच्या सर्व अटींमध्ये अर्जदार पात्र असला पाहिजे असे ICP ने म्हटले आहे.
तसेच सोशल मीडियावर असाही दावा केला जात होता की, भारतीय नागिरकांना AED 1,00,000 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २३.३० लाख भरुन यूएईचा लाईफटाईम गोल्डन व्हिसा मिळणार आहे, परंतु हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
IC[ ने दिलेल्या माहितीनुसार, सर्व व्हिसा अर्जांचे यूएईच्या अधिकृत सरकारी माध्यमांद्वारे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य सल्लागार संस्था काम करत नाही आणि त्यांना अर्ज प्रक्रिया करण्याचा अधिकारही नाही. यामुळे सोशल मीडियावर अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि अधिकृत सरकारी स्त्रोंतांद्वारे माहिती तपासावी अशी सूचना यूएईने दिली आहे.
तुम्हाला यूएईमध्ये राहण्यासाठी एक खास प्रकरची रेसिडेन्सी परवाना मिळेल. हा परवाना मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थायिक होऊ शकतात. व्यवसाय करु शकतात तसेच शिक्षणही घेऊ शकता.