Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : कधीही होऊ शकते युद्ध! Durand Lineवर हालचालींना वेग; पाकिस्तानची आता खैर नाही, सूडाच्या आगीत पटले ‘हे’ देश

Durand Line tension : गेल्या काही आठवड्यांपासून, डुरंड रेषेवर वारंवार चकमकी घडत आहेत. गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, विशेषतः कुर्रम आणि नांगरहार सारख्या भागात तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 26, 2025 | 01:12 PM
Afghan-Pak tensions spike on Durand Line as both deploy artillery

Afghan-Pak tensions spike on Durand Line as both deploy artillery

Follow Us
Close
Follow Us:
  1. ड्युरंड रेषेवर तालिबान आणि पाकिस्तान सैन्यात युद्धसदृश तणाव; जड तोफखाना तैनात.
  2. पाकिस्तानचे चार प्रांतांवर ड्रोन हल्ले; नऊ मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू, तालिबानचा ‘इस्लामिक बदला’ घेण्याचा इशारा.
  3. राजनैतिक चर्चा ठप्प; चमन, तोरखम, कुर्रम-नांगरहार सीमेलगत पूर्ण युद्धाची तयारी.

Border clash Durand Line 2025 : ड्युरंड रेषेवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan Pakistan tensions) यांच्यातील जुना सीमावाद पुन्हा उफाळून आला असून परिस्थिती सध्या युद्धसदृश बनली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कुर्रम, नांगरहार, चमन-स्पिन बोल्डिक आणि तोरखम परिसरात दोन्ही बाजूंकडून सतत गोळीबार, चकमकी आणि सैन्य हालचाली दिसून येत आहेत. विशेषतः पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सैन्य आणि जड तोफखाना आघाडीच्या चौक्यांवर तैनात केल्याने संघर्षाचा धोका आणखी गंभीर झाला आहे. तालिबानही (Taliban) या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत नाही. अफगाण बाजूनेही त्यांचे रॉकेट युनिट्स आणि फ्रंटलाइन ब्रिगेड्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तालिबान ड्युरंड रेषेला वैध सीमा मानत नसल्याने या भागात वाद कायम आहे आणि दोन्ही देशांतील अविश्वास वाढत चालला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानने खोस्त, पक्तिका, पक्तिया आणि नंगरहारसह चार अफगाण प्रांतांवर तीव्र ड्रोन व हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ मुलांसह किमान दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अफगाण सूत्रांनी दिली आहे. अनेकजण गंभीर जखमी असून तालिबान प्रशासनाने या कारवाईला “जाणूनबुजून केलेला आक्रमक हल्ला” म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Visa Row USA : H-1B व्हिसा फ्रॉड! अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने यंत्रणेचा उडवला फज्जा; भारतावर लावले ‘मर्यादा ओलांडण्याचे’ आरोप

या सर्व घडामोडींनंतर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुहाजिद यांनी पाकिस्तानवर ‘इस्लामिक कायद्यानुसार बदला’ घेण्याची उघड चेतावणी दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढल्याचे निरीक्षकांचे मत आहे. पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर वाढला आहे. चमन-स्पिन बोल्डिक, अंगूर अड्डा, कुर्रम-नांगहार आणि तोरखम मार्गावर सतत हवाई देखरेख सुरू असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्करी संघर्षाची भीती निर्माण झाली आहे.

MASSIVE AFGHAN – PAK CLASHES OVERNIGHT. Several Pakistan soldiers killed. Pakistan posts along contested Durand Line fall in wave after wave of attacks.
Pak Airforce had struck Kabul last week when Afghan FM held talks with India’s EAM. pic.twitter.com/t5YvWNtSho
— Rahul Shivshankar (@RShivshankar) October 12, 2025

credit : social media

 सूत्रांनुसार, दोन्ही बाजूंनी आघाडीचे तळ मजबूत करण्याचे काम युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही देशांनी जड तोफखाना, रॉकेट सिस्टम आणि पायदळ युनिट्स सीमेवर तैनात केले असून परिस्थिती कधीही बिघडू शकते. अनेक सीमा चौक्यांना ‘अत्यंत उच्च सतर्कता’ घोषित करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सीमा भाग रिकामी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप

या वाढत्या संकटात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे राजनैतिक चर्चांचे पूर्णपणे ठप्प होणे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानकडून आता कोणतीही सकारात्मक अपेक्षा नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संवाद दारातच अडकला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या गंभीर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे कारण या दोन देशांतील मोठा संघर्ष दक्षिण आणि मध्य आशियातील स्थिरतेला मोठे धक्के देऊ शकतो. संरक्षण तज्ञांच्या मते, जर परिस्थिती अशीच वाढत राहिली आणि संवाद पुनर्प्रस्थापित झाला नाही, तर ड्युरंड रेषा पुन्हा एकदा प्रादेशिक युद्धाची धग घेऊ शकते. या तणावाचा फटका शेजारी देशांना, व्यापारमार्गांना आणि मानवी संकटांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ड्युरंड रेषेवर तणाव का वाढला आहे?

    Ans: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर तालिबानने बदला घेण्याची धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.

  • Que: या संघर्षात किती मृत्यू झाल्याची नोंद आहे?

    Ans: चार प्रांतांवरील ड्रोन हल्ल्यांत नऊ मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाचा धोका किती आहे?

    Ans: दोन्ही देशांनी जड तोफखाना व सैन्य तैनात केल्याने पूर्णप्रमाणात युद्धाची भीती वाढली आहे.

Web Title: Afghan pak tensions spike on durand line as both deploy artillery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • pakistan army
  • third world war

संबंधित बातम्या

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती
1

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती

Japan-China Tensions : तैवान वादाचा स्फोट! जपान-चीन संघर्षात आता अमेरिकेची धडक एंट्री; Trumpने घेतली कोणाची बाजू?
2

Japan-China Tensions : तैवान वादाचा स्फोट! जपान-चीन संघर्षात आता अमेरिकेची धडक एंट्री; Trumpने घेतली कोणाची बाजू?

Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश
3

Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.