American Bering Air plane missing with 10 people missing in Alaska
वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या विमान अपघाताच्या घटनेत वाढत होत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच सिएटलमध्ये दोन विमानांची टक्कर झाली होती, तर त्यापूर्वी फिलोडेल्फियात आणि त्या आधी वॉशिंग्टन डीसीच्या जवळच्या विमानतळावरही मोठा अपघात झाला होता. आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या अलास्कामधून एक विमान अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील अलस्कामदून एक चार्टर्ड विमान 10 जणांना घेऊन गायब झाले आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान बेरिंग एअर कंपनीचे असून अलास्काच्या उनालाक्लीट येथून नोमला प्रस्थान केले होते. मात्र, त्यानंतर ते प्रवासी आणि क्रू मेंमबर्ससह अचानक बेपत्ता झाले. या विमानाचा एक मलबा शुक्रवारी नोमपासून 54 किमी दक्षिण-पूर्व दिशेला सापडला.
3 मृतदेहांची ओळख पटली
मीडिया रिपोर्टनुसार, या विमानात 9 प्रवासी आणि एक पायलट होता. फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट च्या प्लाइट रडारच्या डाटानुसार, विमान उड्डाण केल्याच्या अवघ्या 39 मिनिटांनंतर गायब झाले. उनालाक्लीट ते नोम हे अंतर 234 किमी आहे. अमेरिकेन तटरक्षक दलाने आतापर्यंत 3 मृतदेहांची ओळख पटवली आहे उर्वरित मृतहेह अजूनही विमानत आहे. खराब हवामानामुळे रेक्स्यू टिम इतर लोकांपर्यंत पोहचू शकलेली नाही.
शोध मोहिम अद्यापही सुरुच
तसेच बेपत्ता विमानातील सर्व प्रवाशांच्या कुटूंबियांना घटनेची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती, यामुळे विमान अद्याप सापडलेले नाही. शुक्रवारी सकाळी रेस्क्यू टीमने शोध घेण्यास सुरुवात केली मात्र, कोणताही ठावठिकाणा लागला नाही. फायर डिपार्टमेंटने खराब हवामानामुळे इतर लोकही लापता होण्याच्या धोक्याचाही इशारा शोध मोहिमेत सहभागी लोकांना दिला होता.
अलास्काच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित उनालाक्लीट हे नॉर्टन साउंड खाडीच्या जवळ आहे. येथे सुमारे 690 स्थायिक राहतात. नोम हे देखील पश्चिम किनाऱ्यावर असून 1890च्या दशकात येथे सोन्याच्या शोधामुळे हे ठिकाण प्रसिद्ध झाले. येथे सध्या 3500 हून अधिक लोकसंख्या आहे.
यापूर्वीचे विमान अपघात
अलीकडच्या काही काळात अमेरिकेत अनेक विमान अपघात झाले आहे. यामध्ये 29 जानेवारीला वॉशिंग्टन DC मध्ये झालेल्या मोठ्या विमान अपघातात 67 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एक प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांची धडक झाली. या अपघातानंतर प्रवासी विमान पोटोमॅक नदीत तीन तुकड्यांत सापडले. या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोघांचेही ब्लॅक बॉक्स मिळाले होते. तसेच