पाकिस्तानातील तरुणाचा अमेरिकेवर Cyber Scam प्रयत्न FBI केला उघड केला आहे (फोटो - istock)
इस्लामाबाद : पाकिस्तान देशाच्या कुरघोड्या काही थांबता थांबत नाही. पाकिस्तान थेट अमेरिकेवर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने हाणून पाडला आहे. FBI ने याबाबत अधिकची माहिती देत खुलासा दिला आहे. तसेच पाकिस्तानाला इशारा देखील दिला आहे.
FBI म्हटले आहे की, अमेरिकेच्या न्याय विभागाने (डीओजे) पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, 39 सायबर गुन्हेगारी वेबसाइट आणि त्यांचे सर्व्हर जप्त करण्यात आले. एफबीआयने या कारवाईची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, या टोळीचे नेतृत्व सॅम रझा नावाच्या एका व्यक्तीकडे आहे, जो पाकिस्तानमध्ये राहतो आणि डार्कवेबवर “हार्टसेंडर” म्हणून ओळखला जातो. हा सायबर गुन्हेगार 2020 पासून हॅकिंग टूल्स आणि फसवणुकीशी संबंधित वेबसाइट्स ऑनलाईन विकण्यात सहभागी होता. या साधनांचा वापर फिशिंग हल्ले, ओळख चोरी आणि बँकिंग फसवणूक यासारख्या बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी केला जात असे.
ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला
अमेरिकेतील हजारो लोकांना ऑनलाइन फसवणुकीचे बळी बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने अमेरिकेतील हजारो लोकांना ऑनलाइन फसवणुकीचे बळी बनवल्याचे एफबीआयच्या तपासात उघड झाले आहे. या टोळीच्या कारवायांमुळे अमेरिकन नागरिक आणि कंपन्यांना अंदाजे $3 दशलक्ष (सुमारे 25 कोटी रुपये) नुकसान झाले आहे. हे गुन्हेगार बनावट वेबसाइट्सद्वारे केवळ फिशिंग हल्ले करत नव्हते तर ‘स्कॅम पेज’ देखील विकत होते. याचा वापर इतर सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी करत होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अपडेट घ्या जाणून
अमेरिकेच्या तपास संस्थांनुसार, पाकिस्तानशी जोडलेल्या एका सायबर टोळीने मोठ्या कंपन्यांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांचे पैसे बनावट खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला. याशिवाय, ही टोळी लोकांची वैयक्तिक माहिती चोरून मोठे घोटाळे करण्यातही सहभागी होती. या कारवाईत अमेरिकेला नेदरलँड्स पोलिसांचेही सहकार्य मिळाले आहे. दोन्ही देशांच्या एजन्सींनी मिळून या सायबर टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले आणि त्यांचे सर्व्हर जप्त केले.
युट्यूब द्वारे प्रशिक्षण
तपासात असे दिसून आले की सॅम रझा हा केवळ सायबर गुन्ह्यांमध्येच सहभागी नव्हता तर तो युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून इतर गुन्हेगारांनाही प्रशिक्षण देत होता. तो त्याच्या हॅकिंग टूल्स वापरण्याच्या पद्धती शिकवत असे, ज्यामुळे लोकांना फसवणे सोपे जायचे. ही साधने इतकी प्रगत आणि धोकादायक होती की ती कोणत्याही सुरक्षा प्रणाली आणि अँटीव्हायरसला सहजपणे फसवू शकत होती. भविष्यात अशा सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवता यावे म्हणून या प्रकरणात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे.