चिन्मय दास जामीन सुनावणी एक महिन्याच्या लांबणीवर; वकिलांवर खोटे गुन्हे दाखल
ढाका: देशद्रोहाच्या आरोपाखीला अटक झाल्यानंतर चिन्मय प्रभु दास यांच्या जामीनाची सुनावणी आज ( 3 डिसेंबर) होणार होती. मात्र आता ही सुनावणी एक मिहन्याच्या लांबणीवर गेली आहे. दास यांना आता आणखी एक महिनाभर तुरूंगात राहावे लागणार आहे. बांगलादेश न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज सुनावणी पुढील महिन्यापर्यंत ढकलली आहे. आज सुनावणी दरम्यान एकही वकिल कोर्टात हजर नव्हता अशी माहिती समोर आली आहे. याआधी त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला होता.
याशिवाय चिन्मय दास यांची केस लढणाऱ्या वकिलावर देखील हल्ला करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार वकिलावर इस्लामिक कट्टरवाद्यांनी हल्ला केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. दास यांचा खटला लढणारे वकिल सध्या ICU मध्ये आहेत. तसेच या हल्ल्यानंतर इतर वकिलांनी जामिनाच्या सुनावणीसाठी हजर राहण्यास नकार दिला. यामुळे चिचगाव न्यालयाने सुनावणी लांबवली आहे. पुढील महिन्याच्या 2 जानेवरी 2025 ला ही सुनावणी ढकलण्यात आली आहे.
वकिलांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
मीडिया रिपोर्टनुसार, चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीला वकिलांना उपस्थित राहण्यापासून रोखम्यासाठी सुमारे 70 हिंदू वकिलांवर खोटे आरोप करण्यात आले आहे. हे आरोप बांगलादेशातील सनातनी जोतने केले असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चितगाव पोलिस ठाण्यात स्फोटक काद्यांतर्गत वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा दावा ISKCON ने केला आहे.
ISKCON कोलकाता प्रवक्ते
ISKCON कोलकाता प्रवक्ते राधारमण यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चिन्मय दास यांच्या वकिलांवर क्रूर हल्ला करण्यात आला या ते आपला जीव वाचवण्यासाठी आयसीयूमध्ये धडपडत आहेत. मात्र, बांगलादेशीतल कोणत्याही वकिलांनी असा प्रकार घडल्याचे सांगितले नाही. सध्या बांगलादेशातील परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
चिन्मय दास यांच्या अटकेनंतर हिंसाचार उफाळला
बांगलादेशात हिंदू समुदायावरील ह्ल्ले सुरूच आहेत. चिन्मय दास आणि त्यांच्यासह आणखी दोन हिंदू व्यक्तींच्या अटकेनंतर हा हिंसाचार अधिक उफाळला आहे. चितगाव येथील इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेध करत हजारो हिंदू लोक रस्त्यावर उतरले आहेत.